जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / पहिल्या भेटीनंतर शाहरुख गौरीला म्हणाला होता, “तू मला तुझा भाऊच समज”

पहिल्या भेटीनंतर शाहरुख गौरीला म्हणाला होता, “तू मला तुझा भाऊच समज”

पहिल्या भेटीनंतर शाहरुख गौरीला म्हणाला होता, “तू मला तुझा भाऊच समज”

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौरी(Gauri Khan)ची प्यारवाली लव्हस्टोरी तर आपल्याला माहितीच आहे. पण पहिल्या भेटीनंतर असं काय घडलं होतं की शाहरुख गौरीला म्हणला, “तू मला तुझा भाऊच समज”. किंग खानच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांसाठी हा खास किस्सा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑक्टोबर : बॉलिवूडचं आयडिअल कपल मानलं जाणाऱ्या शाहरुख खान (Shah Rukh Khan)आणि गौरी खान (Gauri Khan) यांच्या लग्नाला आज 29 वर्ष पूर्ण झाली आहेत. शाहरुख आणि गौरी हे एक असं कपल आहे की त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना सतत उत्सुकता असते. शाहरुख आणि गौरीच्या प्रेमात सुरुवातीच्या काळात बरेच ट्विस्ट येऊन गेले आहेत. शाहरुख आणि गौरीची प्रेमकहाणी देखील एखाद्या सिनेमासारखी आहे. धर्म वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्या लग्नात अनेक अडचणी आल्या. शाहरुख आणि गौरी एका मित्राच्या पार्टीमध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यांची भेट अक्षरक्ष: 5 मिनिटांची होती. ते दोघं भेटले तेव्हा गौरीचं वय जेमतेम 14 होतं. तर शाहरुख 18 वर्षांचा होता. पहिल्याच भेटीमध्ये शाहरुखला गौरी प्रचंड आवडली होती. त्याने गौरीला, “माझ्यासोबत डान्स करशील का ?” असं विचारलं. त्यावर गौरी म्हणाली, मी माझ्या बॉयफ्रेंडची वाट बघत आहे. खरंतर गौरीचा त्यावेळी कोणताही बॉयफ्रेंड नव्हता. या पार्टीनंनतर शाहरुखने गौरीच्या बॉयफ्रेंडची चौकशी केली. त्यानंतर त्याला खरी गोष्ट समजली की, गौरीचा बॉयफ्रेंड नाहीये आणि ती पार्टीच्या दिवशी तिच्या भावाची वाट बघत होती. मग शाहरुखने गौरीचा नंबर मिळवला.  शाहरुखने कॉल केल्यावर गौरीने “तुम्ही कोण बोलत आहात?” असं विचारलं. त्यावर शाहरुख म्हणाला, “तू मला तुझ्या भावासारखंच समज”. या सांवादानंतर गौरीला समजलं की शाहरुखच फोन करुन तिची फिरकी घेत आहे. शाहरुखच्या अशा चतुरपणामुळे ती शाहरुखकडे आकर्षित झाली. आणि हळूहळू त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. बॉलिवूडमध्ये अनेकदा घटस्फोट होणं, नवार बायको वेगळे होणं अशी उदाहरणं आपण पाहिली आहेत. पण शाहरुख आणि गौरी याला अपवाद आहेत. म्हणूनच बॉलिवूडमधलं आयडिअल कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात