मुंबई, 28 जुलै : पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर आणि भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू यांच्या लव्हस्टोरीज सध्या बऱ्याच चर्चेत आहेत. त्याच दरम्यान ‘गदर 2’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित असलेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ या 2001मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. ‘गदर 2’फिल्मचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्या संबंधांवर पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटलं आहे. याच गदारोळात ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा 22 वर्षांपूर्वीचा एक इंटरव्ह्यू व्हायरल झाला आहे. त्यात इंरव्ह्यूमध्ये त्यांनी ‘गदर : एक प्रेमकथा’ या सिनेमावर खूप टीका केली होती. भारत-पाकिस्तान फाळणीच्या अनुषंगाने भूमिकांचं चित्रण करणारी ती फिल्म भावना भडकावणारी होती, असं त्यांनी त्यात म्हटलं आहे; मात्र नेहमी शांत असणारे अभिनेते सनी देओल यांनी शबाना आझमी यांच्या त्या वक्तव्यावर सडेतोड उत्तर दिलं होतं. सनी देओल यांनी त्या सिनेमात ‘दारा सिंग’ची भूमिका केली होती. ‘गदर 2’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे फॅन्सना सिनेमा प्रदर्शित होण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. 2001च्या ‘गदर’ने बॉक्स ऑफिसवर विक्रम केला होता. शबाना आझमी यांनी एका मुलाखतीत त्या सिनेमावर टीका केली होती.
‘तो सिनेमा भावना भडकावणारा होता. तसंच मुस्लिमविरोधी होता,’ असा आरोप शबाना आझमी यांनी केला होता. 2001 साली ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या सिनेमात हिंदूंना पीडित आणि मुसलमानांना खलनायक रूपात सादर करण्यात आलं होतं. त्यांनी फिल्मच्या टायमिंगवरही प्रश्न उपस्थित केले होते. कारण त्या वेळी भारत आणि पाकिस्तानमधला तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात होता. ‘त्या क्षणी त्याच्या कानाखाली…’ पत्नी मरणाच्या दारात असताना चाहत्याची ती मागणी ऐकून संतापलेला अभिनेता शबाना आझमी म्हणाल्या होत्या, ‘हा सिनेमा राष्ट्रवाद, धर्म, ओळख या मुद्द्यांवर संभ्रम निर्माण करतो. फाळणीमुळे झालेल्या वेदनांच्या मुळांवर, गुंतागुंतीवर भाष्य करत नाही.’ फाळणी हा एक असा मुद्दा आहे, की ज्यावर बोलण्याची, चर्चा करण्याची गरज आहे, असं त्या म्हणाल्या होत्या. तसंच, फिल्मवर बंदी घालण्याच्या आवाहनाला आपण खतपाणी घातलं नसून, आपण दुष्प्रचाराच्या विरोधात आहोत, असं त्या म्हणाल्या होत्या.
सनी देओल यांचं प्रत्युत्तर फिल्मबद्दल शबाना आझमी यांचं मत सनी देओलना अजिबात पटलं नाही. त्यांनी एका इंटरव्ह्यूत सांगितलं, की ‘त्यांनी फिल्मच्या विरोधात अशी भडकावणारी वक्तव्यं करणं योग्य नाही. अनेकदा अनेक जण बातम्यांत, चर्चेत राहण्यासाठी एखाद्या सिनेमाच्या विरोधात बोलतात, जेणेकरून त्यांच्याकडे लक्ष वेधलं जाऊ शकेल. मी एक मॅच्युअर व्यक्ती आहे. एखाद्याच्या धर्माला धक्का लागेल, धार्मिक भावना दुखावतील असं मी कधीही काही करणार नाही. फिल्ममध्ये सगळं काही योग्य होतं, हे प्रेक्षकांनी सिद्ध केलं. कारण काही चुकलेलं असतं, तर फिल्मला इतकी लोकप्रियता मिळाली नसती.’