जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘त्याने मला पोट दाखवायला सांगितलं अन्..’ आणखी एका अभिनेत्रीचा साजिद खानवर गंभीर आरोप

‘त्याने मला पोट दाखवायला सांगितलं अन्..’ आणखी एका अभिनेत्रीचा साजिद खानवर गंभीर आरोप

‘त्याने मला पोट दाखवायला सांगितलं अन्..’ आणखी एका अभिनेत्रीचा साजिद खानवर गंभीर आरोप

शेवटी कनिष्का म्हणाली, ‘मला बिग बॉसचे अँकर सलमान खानकडून अशी अपेक्षा नव्हती. मला समजत नाही की ते मुलींची छेड काढणाऱ्या, मारहाण करणाऱ्या लोकांना त्यांच्या शोमध्ये घेण्यास परवानगी कशी देतात.’

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 29 ऑक्टोबर : फिल्ममेकर साजिद खान बिग बॉस 16 मध्ये स्पर्धक म्हणून दिसतोय. जेव्हापासून त्याने या शोमध्ये एंट्री केली, तेव्हापासून त्याला शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. MeToo चे आरोप असलेल्या साजिद खानला बिग बॉसमध्ये घेतल्याने अनेक अभिनेत्री विरोध करत आहेत. ‘दिया और बाती हम’ फेम टीव्ही अभिनेत्री कनिष्का सोनी हिनेही साजिद खानबाबत मोठा खुलासा करत त्याच्यावर आरोप केला आहे. ‘दिया और बाती हम’ फेम कनिष्का सोनीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने साजिद खानवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये कनिष्का म्हणाली, ‘काही दिवसांपूर्वी मी मीडियाला एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये मी सांगितलं होतं, की एक दिग्दर्शक-निर्माता आहे ज्याने मला घरी बोलावलं आणि मला तुझं पोट बघायचं आहे, असं म्हणाला होता. तेव्हा मी म्हटलं होतं की, मला त्या दिग्दर्शकाचं आणि निर्मात्याचं नाव घ्यायचं नाही; पण मला आता कळलं, की माझ्यासोबत असं कृत्य करणाऱ्यांपैकी एक डायरेक्टर बिग बॉसच्या घरात आहे. मला आधी त्याचं नाव घ्यायचं नव्हतं. त्यांचं नाव घेण्यापूर्वी मी इतकी घाबरले होते, की मला अजूनही भारतात यायलाही भीती वाटते, कारण हे लोक खूप पॉवरफुल आहेत आणि ते काहीही करू शकतात. मला नाव सांगायला भीती वाटते पण तरीही मी आज सांगेन, कारण बिग बॉसमध्ये तुम्ही त्याला जी प्रसिद्धी दिली आहे, त्याला तो पात्र नाही आणि त्याचं नाव आहे साजिद खान.’ भारती सिंग-हर्ष लिंबाचियाच्या अडचणीत वाढ; ड्रग्स प्रकरणात NCB ने केली मोठी कारवाई कनिष्का पुढे म्हणाली, ‘2008 मध्ये जेव्हा मी दोन रिअॅलिटी शो केले तेव्हा माझी भेट साजिद खानशी झाली. तेव्हा जास्त कमाई होत नव्हती म्हणून मी सेलिब्रिटींच्या मुलाखती घ्यायचे. मग एकेदिवशी मी साजिद खानला मुलाखतीसाठी कॉल केला. त्यानी मला साजिद नाडियाडवाला यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं. मी बाल्कनीत त्याची मुलाखत घेतली होती, तेव्हा मला अभिनयात करिअर करायचंय, तुम्ही मला मदत कराल का, असं विचारलं होतं. त्यानंतर त्याने मला त्याच्या घरी बोलावलं. मला वाटलं, की जर मला हिरॉईन बनायचं असेल तर रिस्क घ्यावी लागेल आणि मी त्याच्या घरी गेले.’ ‘जेव्हा मी साजिद खानच्या खोलीत त्याच्याशी बोलण्यासाठी गेले तेव्हा त्याने मला उभं राहण्यास सांगितलं. त्याने माझी फिगर पाहिली आणि म्हणाला तू परफेक्ट आहेस. मी एक चित्रपट बनवत आहे आणि त्यात मी दीपिका पदुकोणला कास्ट करत आहे. तुझी फिगर चांगली आहे. तू ‘मेन लीड’ हिरॉईन मटेरियल आहेस, मला तुझं पोट बघायचंय. काळजी करू नकोस, मी तुला हात लावणार नाही. मी त्याला हात जोडून म्हणाले, की मी माझं पोट दाखवू शकत नाही. यानंतर तो म्हणाला की ठीक आहे, मग मी तुला माझ्या चित्रपटात घेऊ शकत नाही,’ असंही कनिष्कानी सांगितलंय. Bigg Boss 16: ‘तिने इन्स्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्स खरेदी केलेत’; टीना दत्ताचा सौंदर्यावर मोठा आरोप कनिष्का पुढे म्हणाली, “दिया और बाती हम’च्या वेळी मी साजिद खानला पुन्हा भेटले. मला वाटलं आता तो बदलला असेल. मी त्याला भेटायला पुन्हा त्यांच्या घरी गेले आणि चित्रपटात भूमिकेसाठी विचारलं. मग त्यानी मला म्हटलं की, तू खूप साधी मुलगी आहेस. मला माझ्या चित्रपटांमध्ये बोल्ड मुलगी हवी आहे. मला नाव सांगताना भीती वाटतीये कारण त्यानी मला मारून टाकू नये. त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं. मला अशा मुलीशी लग्न करायचं आहे, जी मी जे काही करेन, तेच करेल, असं साजिदने म्हटलं होतं.” शेवटी कनिष्का म्हणाली, ‘मला बिग बॉसचे अँकर सलमान खानकडून अशी अपेक्षा नव्हती. मला समजत नाही की ते मुलींची छेड काढणाऱ्या, मारहाण करणाऱ्या लोकांना त्यांच्या शोमध्ये घेण्यास परवानगी कशी देतात.’ दरम्यान, गेले काही दिवस साजिदवर फिल्म इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री सातत्याने लैंगिक शोषणाचे आरोप करत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात