मुंबई, 31 जानेवारी : प्रेक्षक नित्यनियमानं टीव्हीवर आपल्या आवडत्या मालिका पाहात असतात. पण दर आठवड्याला येणारं टीआरपी रेटिंग मालिका कुठल्या जास्त पाहिल्या गेल्या. कुठल्या मालिकांचा प्रेक्षकवर्ग कमी झालाय, हे सांगत असतं. या वेळचं टीआरपी रेटिंग खूप वेगळं आहे. थोडंस अनपेक्षितही. यावेळी पाचव्या नंबरवर पोचलीय ‘तुला पाहते रे’ मालिका. जी दोन आठवड्यापूर्वी नंबर वन होती. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेला तिनं पहिल्या स्थानावरून हटवलं होतं. हे रेटिंग लग्नानंतरच्या आठवड्याचं आहे. ईशा आणि विक्रांतचा संसार सुरू झालाय. त्याच्यावर जालंधरची छाया पडते. तो खलनायक आहे. लग्न प्रेक्षकांनी एंजाॅय केलं, पण आता संसारातला गोडवा प्रेक्षकांना अति झाला असावा. चला हवा येऊ द्या हा शो कधी पाचव्या तर कधी चौथ्या स्थानावर असतो. गैरमालिका कॅटेगरीत तो नेहमीच पहिल्या पाचात आहे. विनोदात तोचतोचपणा न येता उत्स्फूर्तता जाणवते आणि तीच प्रेक्षकांना धरून ठेवते. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेनं यावेळी तिसरं स्थान पटकावलंय. दिवसेंदिवस ही मालिका जास्त चांगली होत चाललीय. त्यातल्या कलाकारांनी उभी केलेली प्रत्येक व्यक्तिरेखा इतिहासाची एकेक पानं उघड करतात. संभाजी महाराज रायगडावर पोचल्यानंतरचा निवाडा, त्यांनी अष्टमंडळातल्या गुन्हेगार मंत्र्यांना दिलेली माफी हे सर्व बघताना इतिहासाचं दर्शन घडतं. प्रत्येक प्रसंगात संभाजी महाराजांचे वेगवेगळे पैलू डाॅ. अमोल कोल्हे यांनी आपल्या शारीरभाषेतून आणि संवादफेकीतून अप्रतिम उभे केलेत. दुसऱ्या नंबरवर पोचलीय ‘तुझ्यात जीव रंगला’. पाठकबाईंची निवडणूक, प्रचारात खुलत जाणारं त्यांचं आणि राणादाचं प्रेम प्रेक्षकांना आवडतंय, असं दिसतंय. पुन्हा एकदा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेनं आपलं पहिलं स्थान टिकवलंय. शनाया, राधिका आणि गुरू यांची केमिस्ट्री चांगलीच रंगतेय. शनायाची गृहिणीच्या रूपातली तारांबळ प्रेक्षकांना आवडतेय. यावेळीही टीआरपी रेटिंग चार्टमध्ये झी मराठीला पर्याय नाही हे चित्र दिसतंय. पण अजून रात्रीस खेळ चाले ही मालिका टीआरपीमध्ये पहिल्या पाचात आली नाही, याचं आश्चर्य वाटतंय. प्रिती झिंटाने नाकारली होती 600 कोटी रुपयांची संपत्ती!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.