मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते आणि वडील घरात एकटेच असतात तेव्हा...

ह.म.बने तु.म. बने मालिकेत संवेदनशील विषय हाताळले जातात. आपल्या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली की वडिलांनी काय करावं, हा विषय हाताळलाय.

News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2019 10:59 PM IST

मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते आणि वडील घरात एकटेच असतात तेव्हा...

मुंबई, 10 जानेवारी : सगळ्या वाहिनींच्या गर्दीत काही दिवसांपूर्वी सोनी मराठी सुरू झालीय. टीआरपीच्या भाऊगर्दीत ही वाहिनी नसली तरी यावर खूप वेगळे विषय हाताळले जातात.

ह.म.बने,तु.म.बने नावाची एक मालिका आहे. एका एकत्र कुटुंबाची गोष्ट. त्यात वेगवेगळे विषय हाताळले जातात.

त्यात मासिक पाळीबद्दल किती पुरुषांना माहीत आहे, हा विषय मालिकेत घेतला. घरात मुलगी एकटी असते आणि सोबत तिचे वडील. आई बाहेर गेलेली असते. अशा वेळी मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी सुरू होते. मग वडील काय करतात? कसं समजावून देतात?

सोनीनं या संदर्भात सर्वेही केलाय. त्यात अनेक तरुणांना मासिक पाळीबद्दल विचारलं. ते आपल्या मुलीशी याबद्दल बोलू शकतील का? त्यावर अनेकांनी नकारात्मक उत्तर दिलंय. असं याआधी कधी घडलंच नाही, म्हटलंय.याशिवाय सोनीनं त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली की काय करायचं, याचं गाइड बुक दिलंय.
 

View this post on Instagram
 

तुम्हा सर्वांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत, मासिक पाळी गाईड बुक! नक्कीच कधीतरी तुमच्या मदतीला हे धावून येईल! आणि तुम्हाला कसे वाटले हे गाईड बुक ते आम्हला कमेंट्स मध्ये कळवा! ह.म.बने तु.म.बने. नवीन वाहिनी, सोनी मराठीवर. #हमबनेतुमबने | #HumBaneTumBane #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati @adsarangdhar @ranigunaji @sachinsdeshpande


A post shared by Sony मराठी (@sonymarathi) on

ह.म.बने तु.म. बने मालिकेत आदिती सारंगधर आहे. तिनंही फेसबुकवर तिला जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी आली, तेव्हाचा अनुभव शेअर केलाय. अवास्तव जगात रमणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही वास्तववादी मालिका बरंच काही देऊन जाते.#TRPमीटर : लग्नाच्या धामधुमीलाच प्रेक्षकांची पसंती; शनाया आणि ईशामध्ये चढाओढ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 10:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close