मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /ईशाचा होणारा नवरा 'बिपिन टिल्लू' आहे कसा?

ईशाचा होणारा नवरा 'बिपिन टिल्लू' आहे कसा?

एक बावळट, वडिलांच्या आज्ञेत असणारी, स्वत:ची मतं नसलेली अशी ही बिपिनची व्यक्तिरेखा लक्ष नक्कीच वेधून घेते. ती साकारलीय नवोदित प्रथमेश देशपांडेनं.

एक बावळट, वडिलांच्या आज्ञेत असणारी, स्वत:ची मतं नसलेली अशी ही बिपिनची व्यक्तिरेखा लक्ष नक्कीच वेधून घेते. ती साकारलीय नवोदित प्रथमेश देशपांडेनं.

एक बावळट, वडिलांच्या आज्ञेत असणारी, स्वत:ची मतं नसलेली अशी ही बिपिनची व्यक्तिरेखा लक्ष नक्कीच वेधून घेते. ती साकारलीय नवोदित प्रथमेश देशपांडेनं.

  मुंबई, 25 सप्टेंबर : सध्या झी मराठीवर 'तुला पाहते रे' ही मालिका लोकप्रिय आहे. आता तर या मालिकेत अनेक वळणं सुरू आहेत. त्यातलंच एक म्हणजे ईशा आणि बिपिन टिल्लू  यांचं लग्न ठरलंय. एक बावळट, वडिलांच्या आज्ञेत असणारी, स्वत:ची मतं नसलेली अशी ही बिपिनची व्यक्तिरेखा लक्ष नक्कीच वेधून घेते. ती साकारलीय नवोदित प्रथमेश देशपांडेनं.

  प्रथमेशनं मीडिया एन्टरटेन्मेंटमध्ये एमबीए केलंय. 'मला पहिल्यापासून अभिनयाची आवड होतीच. काॅलेजमध्ये नाटकांमध्ये थोडंफार कामही केलं. दूरदर्शनवर मी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होतो.' प्रथमेश सांगतो. पण अभिनयाचा किडा सतत वळवळत असायचा. त्यासाठीच त्यानं घरातून परवानगी काढली, या क्षेत्रात नशीब अजमावून पाहायची.

  प्रथमेशला 2 वर्ष दिली. 'डू और डाय अशी परिस्थिती माझ्या समोर आली. मग मी ठिकठिकाणी जाऊन आॅडिशन्स देत होतो.' प्रथमेश म्हणाला. अशातच त्यानं या मालिकेसाठी आॅडिशन दिली आणि बिपिनच्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली.

  प्रथमेश सांगतो, ' सुरुवातीला सेटवर दडपण आलं होतं. सुबोध भावेंसारख्या अभिनेत्याचा मूड माझ्यामुळे जायला नको, असं वाटलं होतं. पण इथे चांगला अनुभव आला. सुबोध दादा सांभाळून घेतो, चुकलं तर शिकवतो. कोणाला कसला अॅटिट्युड नाही.'

  'कधी कधी एखादा शाॅट करताना मी वाहवत जात असेन, तर सुबोध दादा मला ओरडतोही.' प्रथमेशला सेट दुसरं घरच झालंय.

  या मालिकेची नायिका गायत्रीही नवीन. प्रथमेश-गायत्रीचीही चांगली मैत्री झाली. प्रथमेश आपल्या यशाचं श्रेय झी मराठी आणि आई,बाबा,भाऊ यांना देतो.

  मालिका, सिनेमा यात त्याला काम करायचंय. सध्या तो एका वेब सीरिजमध्येही काम करतोय. बिपिन टिल्लूमुळे प्रथमेशचे इन्स्ट्राग्राम, फेसबुकवरचे फाॅलोअर्सही वाढलेत.

  हल्ली एन्टरटेन्मेंट चॅनेल्सची संख्या वाढलीय. त्यामुळे अनेक नव्या कलाकारांना संधीही मिळतेय. संधीचं कसं सोनं करायचं हे ज्याच्या त्याच्या हातात.

  एका माॅडेलनं सांगितलं जलोटा-जसलीनच्या नात्यातलं सनसनाटी सत्य

  First published: