मुंबई, 8 नोव्हेंबर : दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला आता आपल्यात नाही, पण त्यांचे चाहते त्यांना विसरलेले नाहीत. मूसेवालाचे प्रत्येक गाणे चाहत्यांच्या ओठावर आहे. त्याचं शेवटचं ‘वार’ गाणं आज रिलीज झालं आहे, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे गाणे गुरु नानक देवजींच्या प्रकाश पर्वाच्या मुहूर्तावर रिलीज होत आहे. दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसवालाचे ‘वार’ हे शेवटचे गाणे आज रिलीज झाले आहे. या गाण्याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे, काही वेळापूर्वीच प्रदर्शित झालेल्या या गाण्याला तासाभरात रेकॉर्डब्रेक व्ह्यूज मिळाले आहेत. गायकाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करून त्याच्या ‘वार’ गाण्याच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली, त्यानंतर चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत होते. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतरचे त्याचे दुसरे गाणे ‘वार’ रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हेही वाचा - गंभीर आजाराशी लढा देत असलेल्या वरुण धवनने शेअर केली Health Update, म्हणाला… सिद्धू मूसेवालाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या ‘वार’ गाण्याची क्लिपही शेअर करण्यात आली. त्याचवेळी सिद्धू मूसेवालाच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज झालेल्या या गाण्याला अवघ्या एका तासात 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सिद्धू मूसेवालाचे चाहते सध्या या गाण्याच्या रिलिमुळे खूप आनंदी आहेत.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर त्याचे पहिले गाणे “SYL” रिलीज झाले. याला यूट्यूबवर अवघ्या दोन दिवसांत 25 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याने नंतर बिलबोर्ड रेकॉर्डच्या यादीत स्थान मिळवले. मात्र, भारत सरकारने कायदेशीर अडचणींमुळे हे गाणे यूट्यूबवरून हटवण्यात आले.
सिद्धू मुसेवालाने 2016 मध्ये गाणे लिहिणे आणि गाणी गायला सुरूवात केली होती. ‘परवाना’ या गाण्यापासून सुरुवात केली आणि 2017 मध्ये ‘झी वॅगन’ या युगल गाण्याने गायक म्हणून प्रवास सुरू केला. 2018 मध्ये, सिद्धू मुसेवाला यांनी त्यांचा पहिला अल्बम PBX 1 लाँच केला, जो बिलबोर्ड कॅनेडियन अल्बम चार्टवर 66 व्या क्रमांकावर पोहोचला. त्याच्या ‘47’ या सोलो गाण्याला यूके सिंगल्स चार्टमध्ये स्थान मिळाले.