मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सयाजी शिंदे यांनी विविध भाषा कशा शिकल्या? चाहत्यांना दिल्या या सोप्या टिप्स

सयाजी शिंदे यांनी विविध भाषा कशा शिकल्या? चाहत्यांना दिल्या या सोप्या टिप्स

हिंदी, मराठी, तेलुगु, बिहारी…सयाजी शिंदे वेगवेगळ्या भाषा कशा शिकतात?

हिंदी, मराठी, तेलुगु, बिहारी…सयाजी शिंदे वेगवेगळ्या भाषा कशा शिकतात?

हिंदी, मराठी, तेलुगु, बिहारी…सयाजी शिंदे वेगवेगळ्या भाषा कशा शिकतात?

  • Published by:  Mandar Gurav
मुंबई 15 ऑगस्ट: कोण होणार करोडपती हा छोट्या पडद्यावरील सध्याचा सर्वात चर्चेत असलेल्या शोंपैकी एक आहे. हा शो स्पर्धकांना कोट्यधीश होण्याची संधी देतो. केवळ 15 प्रश्नांची योग्य उत्तरं द्या अन् व्हा कोट्यधीश अशी या शोची थीम आहे. परिणामी देशभरातील लोक या शोमध्ये मोठ्या उत्साहानं भाग घेतात. अन् लाखो रूपयांची कमाई करतात. अलिकडेच या शोमध्ये ‘कर्मवीर विशेष’ भागाच्या निमित्तानं अभिनेते सयाजी शिंदे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विविध भाषा शिकण्याची एक सोपी टीप प्रेक्षकांना दिली. शोचे होस्ट सचिन खेडेकर यांनी सयाजी यांच्या करिअवर भाष्य करत त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटात काम कसं केलं? तिथली भाषा कशी अवगत केली? हा अनुभव विचारला. यावर उत्तर देताना त्यांनी आपल्या कौशल्यामागचा इतिहास सांगितला. मिस युनिव्हर्स चुकून मुलांच्या ग्रुपवर झाली अ‍ॅड; अश्लील मेसेज वाचून बसला धक्का
ते म्हणाले, एका नटला दिवसातून किमान बारा तास काम करावं लागतं. त्यात असे काही समान शब्द असतात जे सतत येत असतात. अशावेळी त्यांनी प्रत्येक भासते सतत येणाऱ्या 100 शब्दांची त्यांच्या अर्थासहित नोंद करून ठेवली आहे. अर्थात ते जिथे जातात तिथल्या बोली भाषेचे निरीक्षण करतात आणि त्यातील शब्द त्यांच्या अर्थासहित एका वहीत लिहून काढतात. ते म्हणतात की, हेच शब्द जोडून त्यांची वाक्य तयार होतात. अशा प्रकारे ते सगळ्या भाषा आत्मसात करतात.
First published:

Tags: Entertainment, Sayaji Shinde, Video viral

पुढील बातम्या