मुंबई, 18 डिसेंबर : मिसेस वर्ल्ड 2022 जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र नव्या मिसेस वर्ल्डची चर्चा पहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीरमधील रहिवासी असलेल्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड 2022 चा किताब पटकावला आहे. भारताच्या सरगम कौशलने अमेरिकेत आयोजित मिसेस वर्ल्ड 2022चे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. सरगमने 21 वर्षांनंतर हा मुकुट भारतात आणला आहे. त्यामुळे सरगमवर खूप सारं प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
21 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय तरुणी सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड विजेतेपद पटकावले आहे. 2001 मध्ये, अभिनेत्री-मॉडेल आदिती गोवित्रीकरने विजेतेपद पटकावले होते. मिसेस वर्ल्ड 2022 कार्यक्रम शनिवारी वेस्टगेट लास वेगास रिसॉर्ट आणि कॅसिनो येथे आयोजित करण्यात आला होता. अमेरिकेच्या मिसेस वर्ल्ड शायलिन फोर्ड यांच्या हस्ते सरगम कौशलचा मुकुट घातला गेला.
View this post on Instagram
मिसेस पॉलिनेशियाला फर्स्ट रनर अप घोषित करण्यात आले आणि त्यानंतर मिसेस कॅनडाला सेकंड रनर अप म्हणून घोषित करण्यात आले. विशेष म्हणजे, मिसेस इंडिया स्पर्धेने रविवारी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर विजेत्याची घोषणा केली. पोस्टची घोषणा करताना लिहिले होते, 'दीर्घ प्रतीक्षा संपली, 21 वर्षांनंतर आम्हाला मुकुट परत मिळाला!'
मिसेस वर्ल्ड झाल्यानंतर सरगम कौशल म्हणाली, 'भारताकडे 21 वर्षांनंतर ताज परत मिळाला आहे. मी खूप उत्सुक आहे. भारतावर प्रेम करा, जगावर प्रेम करा. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सरगम कौशल गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये दिसत असून मिसेस इंडियाचा मुकुट जिंकल्यानंतर सरगमचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले आहेत. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. त्यात अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय, मोहम्मद अझरुद्दीन, कॉउचर डिझायनर मौसमी मेवावाला आणि माजी मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकर यांचा समावेश होता.
दरम्यान, 21 वर्षे अमेरिकन सौंदर्य स्पर्धा जिंकून देशाचे डोके वर काढणारी सरगम कौशल ही जम्मू-काश्मीरची रहिवासी आहे. सरगम ही एक शिक्षिका आहे. 2018 मध्ये तिचं लग्न झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Miss india