जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Prathamesh -Mugdha : आमचं ठरलंय! सारेगमपचा मोदक आणि मॉनिटरचे सुर जुळले, प्रथमेश-मुग्धा रिलेशनमध्ये

Prathamesh -Mugdha : आमचं ठरलंय! सारेगमपचा मोदक आणि मॉनिटरचे सुर जुळले, प्रथमेश-मुग्धा रिलेशनमध्ये

प्रथमेश लघाटेनं मुग्धासोबत फोटो पोस्ट करत दिली प्रेमाची कबुली

प्रथमेश लघाटेनं मुग्धासोबत फोटो पोस्ट करत दिली प्रेमाची कबुली

प्रथमेश लघाटेनं नुकतीच एक पोस्ट केली आहे. यासोबत त्यानं मुग्धा वैशंपायनसोबत एक हातात हात घेतलेला फोटो पोस्ट केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

 मुंबई, 15 जून- रोहित आणि जुईली ही मराठी मनोरंजन विश्वातील कुलेस्ट कपल आहे. जुईलीने अनेक मालिकांची शीर्षक गीतं गायली आहेत. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या मंचावरच या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. यानंतर यांच पुढं जुळलं आणि त्यांनी लग्न देखील केलं. आता याच मंचावरच्या आणखी एका जोडीनं प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत या जोडीनं आमचं ठरलं म्हणत..थेट प्रेमाची कबुली दिली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर सेलेब्ससह चाहत्यांनी देखील त्यांचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला आहे. प्रथमेश लघाटेनं नुकतीच एक पोस्ट केली आहे. यासोबत त्यानं मुग्धा वैशंपायनसोबत एक हातात हात घेतलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं म्हटलं आहे की,Okayy! So! तुम्ही आमच्याकडून ज्या बातमीची अपेक्षा करत होता..तर Finally!!आमचं ठरलंय!❤️ असं म्हणत प्रेमाची कबुली दिली आहे..शिवाय या पोस्टला त्याने#MGotModak #ModakGotMonitor #forever #couplegoals असे हॅशटॅग देखील दिले आहेत. यावरून हे दोघे प्रेमात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जाहिरात

प्रथमेशच्या या पोस्टनंतर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलेब्सनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. सुकन्या मोने, कार्तिकी गायकवाड, स्पृहा जोशी, श्रेया बुगडे, प्रियांका बर्वे यांच्यासह अनेक सेलेब्सनं कौतुक केलं आहे. कार्तिकीनं म्हटलं आहे की, ये बात…खूप खूप अभिनंदन..तर सुकन्या मोने यांनी म्हटलं आहे की,कल्पना होतीच पण नक्की ना! काहीतरी गुगली नाही ना? ❤️❤️तर राहुल देशपांडे यांनी म्हटलं आहे की, दोघांचेही अभिनंदन..चाहत्यांकडूनही या दोघांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन अनेकदा सोशल मीडियावर एकत्र गाणी गाताना दिसतात. या दोघांनी बरीच गाणी एकत्र गायली आहे. या जोडीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.  ही चिमुकली पोरं आता मोठी झाली आहेत..आज पर्यंत सर्वजण त्यांना लिटिल चॅम्प समजत आले आहेत. पण आता ही मुलं मोठी झाली आहेत..आज  प्रथमेशनं प्रेमाची जाहीर कबुली देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे्.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात