• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • संजीव कपूर यांना व्हायचं होतं डॉक्टर अन् झाले शेफ; त्या घटनेमुळं बदललं करिअर

संजीव कपूर यांना व्हायचं होतं डॉक्टर अन् झाले शेफ; त्या घटनेमुळं बदललं करिअर

त्या एका घटनेमुळं त्यांच्या आयुष्यात जबरदस्त बदल झाला. अन् रातोरात त्यांनी डॉक्टरी सोडून पाककला शिकण्याचा निर्णय घेतला. (Sanjeev Kapoor how to become popular chef)

 • Share this:
  मुंबई 10 एप्रिल: संजीव कपूर (Sanjeev Kapoor) हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय शेफ म्हणून ओळखले जातात. भारतीय खाद्य संस्कृती (indian food culture) टीव्ही शोच्या माध्यमातून संपूर्ण जगात प्रसिद्ध करणारे संजीव कपूर आज सेलिब्रिटी शेफ म्हणून चर्चेत असतात. (Celebrity chef) त्यांच्यामुळं देशातील हजारो तरुणांना हॉटेल आणि कुकिंग क्षेत्रात करिअर करण्याचं प्रोत्साहन मिळालं. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल विविध पदार्थ तयार करुन प्रेक्षकांना आश्चर्य चकित करणाऱ्या संजीव कपूर यांना जेवण करण्याची विशेष आवड नव्हती. खरं तर त्यांना डॉक्टर व्हायचं होतं. पण त्या एका घटनेमुळं त्यांच्या आयुष्यात जबरदस्त बदल झाला. अन् रातोरात त्यांनी डॉक्टरी सोडून पाककला शिकण्याचा निर्णय घेतला. (Sanjeev Kapoor how to become popular chef) पाहूया काय होती ती घटना... 10 एप्रिल 1964 साली हरयाणामधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात संजीव कपूर यांचा जन्म झाला. ते ज्या भागात राहायचे त्या ठिकाणी आरोग्य सुविधा फारशा चांगल्या नव्हत्या त्यामुळं त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. त्या अनुशंगानं त्याचं शिक्षणही सुरु झालं. पुढे उच्च शिक्षणासाठी त्यांना आपलं गाव सोडून शहरात यावं लागलं. या ठिकाणी ते आपल्या मित्रमंडळींसोबत एका भाड्याच्या खोलीत राहात होते. त्यावेळी जेवणाची सुविधा नसल्यामुळं जेवण देखील त्यांनाच करावं लागायचं. त्यांनी तयार केलेलं जेवण रुचकर असायचं त्यांमुळं त्यांचे मित्र त्यांना हॉटेल सुरु करण्याचा सल्ला देत होते. सरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं पण हळूहळू त्यांचा लक्षात आलं की डॉक्टरीपेक्षा जेवण तयार करण्यात त्यांना अधिक मजा येते. दरम्यान जस्मीत सिंह नामक एका मित्रानं त्यांना हॉटेल मॅनेजमेंट करण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे त्यासाठी त्यानं काही आर्थिक मदतही केली. अवश्य पाहा - 15 व्या वर्षी झाली कोट्यधीश; प्लास्टिक सर्जरीमुळं संपलं आयशा टाकियाचं करिअर पुढे संजीव कपूर डॉक्टरी सोडून पाककलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊ लागले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना सिंगापूर एअरलाईन्समध्ये कूक म्हणून नोकरी मिळाली. याच दरम्यान त्यांनी एका विदेशी कूकिंग शोमध्ये भाग घेतला होता. यामध्ये ते जिंकले नाहीत. पण त्यांच्या कामाची शैली पाहून त्यांना खाना खजाना या टीव्ही शोला होस्ट करण्याची संधी मिळाली. त्यांनी देखील आवडीनं ही ऑफर स्विकारली. अन् तेथूनच त्यांच्या टीव्ही करिअरला सुरुवात झाली. हा शो सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांनी Top Chef, Cook Smart, Master Chef India, Zee TV, TVPL, Jhalak Dikhla Ja, Bavarchi यांसारख्या अनेक शोमध्ये पाककला सादर केली. अन् आज ते भारतातील सर्वाधिक लोकप्रिय शेफ म्हणून ओळखले जातात.
  Published by:Mandar Gurav
  First published: