जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Happy Birthday Sanjay Leela Bhansali: सलमान खान-ऐश्वर्या रॉयच्या चित्रपटाने पालटलं होतं भन्साळींचं नशीब

Happy Birthday Sanjay Leela Bhansali: सलमान खान-ऐश्वर्या रॉयच्या चित्रपटाने पालटलं होतं भन्साळींचं नशीब

Happy Birthday Sanjay Leela Bhansali: सलमान खान-ऐश्वर्या रॉयच्या चित्रपटाने पालटलं होतं भन्साळींचं नशीब

बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा आज 59 वा वाढदिवस (59 th Birthday) आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24फेब्रुवारी- बॉलिवूडचे   (Bollywood)  ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी  (Sanjay Leela Bhansali)   यांचा आज 59 वा वाढदिवस  (59 th Birthday)  आहे. भन्साळी यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1964 मध्ये मुंबईत झाला होता. भन्साळी ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ आणि ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. भन्साळी यांचा आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भन्साळींसाठी फारच खास आहे. इतकंच नव्हे तर भन्साळींनी या चित्रपटाला त्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ देखील म्हटलं आहे. या सगळ्यांसोबत जाणून घेऊया दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबद्दलच्या काही खास आणि रंजक गोष्टी. शिक्षण- भन्साळी हे बॉलिवूडमध्ये मल्टीटास्कर म्हणून ओळखले जातात. चित्रपट दिग्दर्शक असण्यासोबतच ते निर्माता, संगीत दिग्दर्शक आणि पटकथा लेखक देखील आहेत. भन्साळी यांना लहानपणापासूनच मनोरंजनसृष्टीत नाव कमवायचं होतं. त्यामुळे त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी एडिटिंगचा कोर्सही केला होता. एफटीआयआयमधून फिल्म मेकिंगचा कोर्स केल्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. दिग्दर्शनात पदार्पण- संजयने 1996 मध्ये ‘खामोशी’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांनी ‘परिंदा’ (1989) आणि ‘1942: एक प्रेम कथा’ (1994) मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. ‘परिंदा’ चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं. मैलाचा दगड- 1999 मध्ये सलमान खान, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय स्टारर ‘हम दिल दे चुके सनम’ हा भन्साळीचा पहिला चित्रपट होता, ज्यासाठी ते स्वतः निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 1999 मध्ये सलमान खान, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट केला तेव्हा त्याचे नशीब पालटले. ‘हम दिल दे चुके सनम’ भन्साळींच्या कारकिर्दीसाठी गेम चेंजर ठरला.संजय यांचं कौशल्य आणि चित्रपट बनवण्याची क्षमता या चित्रपटातून समोर आली. या चित्रपटाच्या यशाने संजयला बॉलिवूडच्या टॉपच्या दिग्दर्शकांच्या यादीत नेवून ठेवलं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर भन्साळींचे देवदास, ब्लॅक, सावरिया, गुजारिश, गोलियों की रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत अनेक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात