मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘बॉयफ्रेंडचा मृत्यू कसा झाला?’; खासगी प्रश्नामुळं संजय दत्तची मुलगी संतापली

‘बॉयफ्रेंडचा मृत्यू कसा झाला?’; खासगी प्रश्नामुळं संजय दत्तची मुलगी संतापली

तुझ्या बॉयफ्रेंडचा मृत्यू कसा झाला? तो कुठल्या आजारामुळं मरण पावला? असा वैयक्तिक सवाल त्यानं केला. अर्थात या प्रश्नावर त्रिशाला संतापली अन् तिनं भलंमोठं तत्वज्ञान त्या युझरला दिलं. प

तुझ्या बॉयफ्रेंडचा मृत्यू कसा झाला? तो कुठल्या आजारामुळं मरण पावला? असा वैयक्तिक सवाल त्यानं केला. अर्थात या प्रश्नावर त्रिशाला संतापली अन् तिनं भलंमोठं तत्वज्ञान त्या युझरला दिलं. प

तुझ्या बॉयफ्रेंडचा मृत्यू कसा झाला? तो कुठल्या आजारामुळं मरण पावला? असा वैयक्तिक सवाल त्यानं केला. अर्थात या प्रश्नावर त्रिशाला संतापली अन् तिनं भलंमोठं तत्वज्ञान त्या युझरला दिलं. प

मुंबई 18 मार्च: अभिनेता संजय दत्तची (Sanjay Dutt) मुलगी त्रिशाला दत्त (Trishala Dutt) ही वडिलांप्रमाणे नेहमीच चर्चेत असते. तिनं बॉलिवूडमध्ये अद्याप पदार्पण केलेलं नाही. मात्र तिचं फॅन फॉलोइंग कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. जगभरातील लाखो नेटकरी तिला फॉलो करतात. अलिकडेच तिनं आपल्या चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी ‘आस्क मी एनिथिंग’ हे लाईव्ह सेशन केलं होतं. यामध्ये तिला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. मात्र यामध्ये एका नेटकऱ्यानं विचारलेला प्रश्न सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तुझ्या बॉयफ्रेंडचा मृत्यू कसा झाला? तो कुठल्या आजारामुळं मरण पावला? असा वैयक्तिक सवाल त्यानं केला. अर्थात या प्रश्नावर त्रिशाला संतापली अन् तिनं भलंमोठं तत्वज्ञान त्या युझरला दिलं. पाहूया काय म्हणाली त्रिशाला?... (Trishala replies about boyfriend's death)

'माझा रिप्लाय अगदी कोरडा, थंड वाटत असेल, तर मी आधीच माफी मागते. मी मूर्ख नाही किंवा तुमच्या प्रश्नाने माझा अपमानही झालेला नाही; पण मी लोकांना मूलभूत 101 सामाजिक कौशल्यं शिकवू इच्छिते,' अशा शब्दांत तिने आपल्या दीर्घ उत्तराची सुरुवात केली आहे.

'एखाद्या व्यक्तीशी काहीही संबंध नसला, तरीही त्या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला, हे जाणून घेण्याची इच्छा असणं नैसर्गिक आहे; पण तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळचे नसाल, तरीही तुम्हाला त्याच्या मृत्यूचं कारण हवं असेल, तर तुम्ही विनाकारण संबंधित व्यक्तीच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करता आहात, असा त्याचा अर्थ होतो,' अशा शब्दांत त्रिशलानं चाहत्याला सुनावलं.

'हे तुम्ही मला विचारण्यामागचं कारण काय? माझ्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूचं कारण कळलं, तर त्या व्यक्तीला काही मदत होणार आहे का? की हे फक्त विनाकारण असलेलं कुतुहल आहे?' असा सवालही तिने केला.

'तुम्ही ही माहिती मिळण्यासाठी योग्य व्यक्ती नसाल, तर असे प्रश्न विचारणं थांबवा. अशा प्रश्नांनी संवादाला काहीही उपयोग होत नाही. ज्या व्यक्तीला प्रश्न विचारता आहात, त्या व्यक्तीचं यातून सांत्वनही होत नाही आणि गेलेली व्यक्ती परतही येणार नसते,' असंही त्रिशलाने लिहिलं आहे.

दुसऱ्या एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला, की तिच्या कुटुंबीयांप्रमाणे ती बॉलिवूडमध्ये का आली नाही? त्यावर त्रिशलाने सांगितलं, की तिला एफबीआयमध्ये रस आहे आणि म्हणून ती फॉरेन्सिक सायकॉलॉजी या विषयाचा अभ्यास करते आहे.

दरम्यान, त्रिशलाच्या बॉयफ्रेंडचं 2019मध्ये निधन झालं. त्या वेळी तिने त्याच्याबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केले होते. आपण जगातली सर्वांत आनंदी मुलगी आहोत, असं आपल्याला वाटण्यासाठी त्याने काय काय केलं होतं, त्याबद्दल त्रिशलाने त्यात लिहिलं होतं.

'माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, माझं रक्षण केल्याबद्दल आणि माझी काळजी घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या आयुष्यात मी सर्वांत आनंदी तुझ्यासोबत असताना होते. तुझ्याशी झालेली भेट आणि मी तुझी होणं हे माझं भाग्य होतं. तुझं माझ्याबरोबरचं अस्तित्व चिरंतन राहील. आय लव्ह यू अँड विल मिस यू... पुन्हा भेटेपर्यंत...' अशा शब्दांत त्रिशलाने तिच्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या.

First published:

Tags: Bollywood, Boyfriend, Death, Entertainment, Sanjay dutt, Star celebraties, Trishala dutt