सर्व अडचणींवर मात करत शंभूराजेंचा राज्याभिषेक झाला. राजे म्हणून समाजमान्यता मिळाली. पण शंभूराजेंच्या मनात वेगळंच सुरू होतं. औरंगजेबाच्या सेनेनं जिझिया कराच्या निमित्तानं तुकारामांच्या मुलाची वारी बंद करायची धमकी दिली. त्याचवेळी शंभूमहाराजांनी एक महत्त्वाचा निर्णय मसलत करून घेतला. मोघलांची उपराजधानी, दख्खनचं द्वार असलेल्या बुऱ्हाणपूरवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. सलग 5 दिवस आणि रात्र घोडदौड करून त्यांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला केला. सुरतेच्या लुटीपेक्षा 3 पट लूट जमा केली. शंभूराजांनी ज्यांना ज्यांना युद्धात जबाबदारी दिली होती, ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली. सिंहासनावर बसल्यानंतर शंभूराजांच्या आयुष्यातली सर्वात मोठी मोहीम. बुऱ्हाणपूरच्या विजयानंतर शंभूराजांवर टीका करणाऱ्यांना चपराक मिळाली.