साऊथ अभिनेत्री चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरसुद्धा प्रसिद्धी मिळवत आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे समंथा प्रभू होय.
समंथा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असते.
चाहते तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहात असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिचे चाहते चिंतेत आहेत.
कारण समंथा सध्या सोशल मीडियावरुन गायब आहे. अभिनेत्रीने गेल्या 15 दिवसांपासून एकही पोस्ट शेअर केलेली नाहीय.
समंथाने काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा आहेत. तर काहींना तिच्या खाजगी आयुष्यात सर्वकाही ठीक असेल ना? अशी चिंता वाटत आहे.