Dabangg 3: सलमान खानचं गाणं वादाच्या भोवऱ्यात; #BoycottDabangg3 का होतोय ट्रेंड

Dabangg 3: सलमान खानचं गाणं वादाच्या भोवऱ्यात; #BoycottDabangg3 का होतोय ट्रेंड

दबंग-3 सिनेमातील गाण्यावरून वाद, 'संतांचा अपमान सहन करणार नाही', नेटकऱ्यांनी सुनावलं

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर: सलमान खानचा दबंग-3 सिनेमा रिलिज होण्याआधीच पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडा आहे. दबंग-3 पाहण्यासाठी जेवढा सलमान खानच्या फॅन्समध्ये उत्साह होता त्या उत्साहालाच कुठेतरी तडा जात असल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळालं. सोशल मीडियावर #BoycottDabangg3 हा हॅशटॅन तुफान व्हायरल होत आहे. यामगचं कारण काय आहे माहीत आहे का? हे कारण सलमान खानच्या अडचणीत वाढ करणारं आहे.

सलमान खानच्या दबंग-3 सिनेमातील हुड हुड दबंग गाण्यावर हिंदू जन जागृती समितीनं आक्षेप घेतला आहे. यासोबतच हे गाणं सिनेमातून हटवण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी ह्या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. या गाण्यामध्ये साधू-संत सलमान खानच्या मागे नाचताना दिसत आहेत. हुड हुड दबंग गाण्यावर साधू संत नाचताना शूट केलं आहे. अशा पद्धतीनं हिंदुस्तानात साधू संतांचा अपमान सहन केला जाणार नाही. असं नेटकऱ्यांनी सुनावलं आहे. नेटकऱ्यांनी सलमान खानसोबतच इतर कलाकारांनाही सुनावलं आहे. दरम्यान हे गाणं चित्रपटातून हटवण्याची मागणीही केली जात आहे.

या सिनेमात दबंगमध्ये दिसलेली सलमान आणि सोनाक्षी यांची केमेस्ट्री पुन्हा एकदा दिसणार आहे. मराठी सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करत आहे. सलमान या सिनेमात ‘पोलिसवाला गुंडा’ झाला आहे. याच बरोबर सलमान या सिनेमात सईसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार सलमाननं स्वतः दबंग 3 साठी काही संवाद लिहिले आहेत. तसेच त्याच्या सांगण्यावरून सिनेमाच्या काही डायलॉग्समध्येही बदल करण्यात आले आहेत. सलमान नेहमीच सेटवर इनपुट्स देत असतो. ज्याचा सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये समावेश केला जातो. याशिवाय या सिनेमात तो हाय ऑक्टेन अ‍ॅक्शन सीनच्या कोरिओग्राफीमध्येही महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. हा सिनेमा 20 डिसेंबरला रिलीज होत असून याचं दिग्दर्शन साउथ सुपरस्टार प्रभुदेवा करत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 29, 2019, 2:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading