मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सलमान खाननं शेअर केला वर्कआउट PHOTO, सुशांतच्या चाहत्यांना राग अनावर

सलमान खाननं शेअर केला वर्कआउट PHOTO, सुशांतच्या चाहत्यांना राग अनावर

सलमान खानला पुन्हा एकदा एका नव्या कारणानं सोशल मीडियावर लोकांच्या रागाचा सामना करावा लागत आहे.

सलमान खानला पुन्हा एकदा एका नव्या कारणानं सोशल मीडियावर लोकांच्या रागाचा सामना करावा लागत आहे.

सलमान खानला पुन्हा एकदा एका नव्या कारणानं सोशल मीडियावर लोकांच्या रागाचा सामना करावा लागत आहे.

    मुंबई, 27 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर देशभरात बॉलिवूडच्या घराणेशाहीवरून वाद सुरू आहे. सोशल मीडियावरून सलमान खान आणि करण जोहर यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. अशात सलमान खानला पुन्हा एकदा एका नव्या कारणानं सोशल मीडियावर लोकांच्या रागाचा सामना करावा लागत आहे. सलमाननं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. जो पाहिल्यावर सुशांतच्या चाहत्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी सलमानला चांगलंच सुनावलं आहे.

    सलमान खान लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. नुकताच त्यानं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात तो शर्टलेस दिसत आहे. त्याचा हा फोटो वर्कआउटनंतरचा आहे. सलमान जिममध्ये बसून मोबाईलमध्ये काहीतरी पाहताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सलमानने लिहिलं, बस आत्ताच वर्कआउट पूर्ण केलं.

    View this post on Instagram

    Just finished working out ....

    A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

    पूर्वी सलमाननं शेअर केलेल्या कोणत्याही फोटोवर चांगल्या कमेंट पाहायला मिळत असत. पण आता मात्र काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. सलमाननं हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी त्याच्या फोटोवर राग व्यक्त केला आहे. एका युजरनं लिहिलं, 'सलमान तू 390 चं टीशर्ट बीइंग ह्यूमनचं लेबल लावून 1500 रुपयांना विकलंस आम्ही काहीच नाही बोललो. पण आता तू लोकांचं आयुष्य खराब करायला निघालास तरीही आम्ही काहीच बोलणार नाही असं होणार नाही.' दुसऱ्या एका युजरनं लिहिलं,'यावेळी तुला कोणीच वाचवू शकत नाही. देवाचं लक्ष आहे तुझ्याकडे' तर आणखी एका युजरनं लिहिलं,'...आणि मी आत्ताच तुला अनफॉलो करण्याचं काम पूर्ण केलं.'

    सलमानच्या या पोस्टवर अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड स्टार्सचे फॉलोवर्स कमी झाले. ज्यात सलमान खानचाही समावेश होता. सलमानवर सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक गंभीर आरोप झाले आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Bollywood, Salman khan