मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सलमान खानने सेलिब्रेट केला वडील सलीम खान यांचा बर्थडे; मध्यरात्री शेअर केली खास पोस्ट

सलमान खानने सेलिब्रेट केला वडील सलीम खान यांचा बर्थडे; मध्यरात्री शेअर केली खास पोस्ट

सलीम खान  (Salim Khan Birthday)  86 वर्षांचे झाले आहेत. त्यांनी आपला खास दिवस अतिशय खास पद्धतीने साजरा केला आहे.

सलीम खान (Salim Khan Birthday) 86 वर्षांचे झाले आहेत. त्यांनी आपला खास दिवस अतिशय खास पद्धतीने साजरा केला आहे.

सलीम खान (Salim Khan Birthday) 86 वर्षांचे झाले आहेत. त्यांनी आपला खास दिवस अतिशय खास पद्धतीने साजरा केला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 25 नोव्हेंबर-   सलीम खान  (Salim Khan Birthday)  86 वर्षांचे झाले आहेत. त्यांनी आपला खास दिवस अतिशय खास पद्धतीने साजरा केला आहे. आपले सुख-दु:ख आपल्या बायको-मुलांसोबत वाटून घेणारे सलीम खान हा दिवस आपल्या कुटुंबासोबत कसा साजरा नाही करणार. त्यांनी त्यांच्या 86 व्या वाढदिवसाचा आनंद त्यांच्या पत्नी, मुले, मुली आणि नातवंडांसह शेअर केला आहे. सलमान खानने (Salman Khan)  या सेलिब्रेशनची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आणि आपल्या वडिलांना त्यांच्या खास दिवशी मध्यरात्री शुभेच्छा दिल्या आहेत.

मध्यरात्री भाईजानची पोस्ट-

सलमान खानने वडील सलीम खान यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर कोणतीही  पोस्ट केला नाही,. पण २४ नोव्हेंबरच्या रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास त्याने एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलीम खानचे संपूर्ण कुटुंब एकत्र दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे छायाचित्र पाहून चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या फोटोमध्ये अर्पिताचा पती आयुष दिसत नाहीये.

फोटोमध्ये कोण-कोण आहे-

सलमान खानसोबत त्याचे दोन्ही भाऊ, दोन्ही बहिणी, भावजय, भाचा-भाची, वडील सलीम खान आणि त्यांच्या दोन्ही पत्नी दिसत आहेत. फोटोमध्ये सलीम खान आपला मोठा मुलगा आणि पहिली पत्नी सलमा खान (सुशीला)सोबत सोफ्यावर बसलेले दिसत आहे. त्याच्या समोर असलेल्या  टेबलवर केक ठेवलेले आहेत आणि त्यांनी हातात एक ग्लास धरला आहे.

सलमान खानच्या या पोस्टवर लोक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सलीम खान यांना वाढदिवसानिमित्त लोक खूप शुभेच्छा देत आहेत. सध्या सलमान खान त्याच्या 'अंतिम: द फायनल ट्रुथ' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याचा मेहुणा म्हणजेच आयुष शर्माही दिसणार आहे. या चित्रपटात दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दिसणार आहेत.'अंतिम :द फायनल ट्रुथ' हा चित्रपट उद्या (२६ नोव्हेंबर) चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.  महेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट संपूर्णपणे अॅक्शन-मसाला चित्रपट आहे. ब-याच दिवसांनी सलमान खान मोठ्या पडद्यावर येत असल्याने चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment, Salman khan