जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'सलीम खान, सलमान खान लवकरच तुमचा...' नेमकं काय म्हटलं आहे 'त्या' धमकी पत्रात?

'सलीम खान, सलमान खान लवकरच तुमचा...' नेमकं काय म्हटलं आहे 'त्या' धमकी पत्रात?

'सलीम खान, सलमान खान लवकरच तुमचा...' नेमकं काय म्हटलं आहे 'त्या' धमकी पत्रात?

सध्या सलमान खानला आलेल्या धमकीच्या पत्राचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं या पत्रात काय म्हटलं आहे व हे पत्र कुणी पाठवल आहे याचा सर्वांना प्रश्न पडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 6 जून- पंजाबी गायक ‘सिद्धू मूसेवाला’ याच्या हत्येनंतर (Sidhu Moosewala Murder) बॉलिवूड अभिनेता ‘सलमान खान व त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी (Salman Khan threat letter) आल्यानं एकच खळबळ माजली आहे. यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत महाराष्ट्र सरकारकडून वाढ करण्यात आली आहे. सध्या सलमान खानला आलेल्या धमकीच्या पत्राचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं या पत्रात काय म्हटलं आहे व हे पत्र कुणी पाठवल आहे याचा सर्वांना प्रश्न पडला आहे. या धमकी पत्रात नेमक काय म्हटलं आहे? सलमान खानला आलेल्या या धमकी (Salman Khan threat letter)  पत्रातील मजकूर हा हिंदी भाषेत आहे. यामध्ये म्हटलं आहे की, सलीम खान, सलमान खान बहुद जल्द आपका मुसेवाला होगा G.B L.B आता याप्रकरणी पोलीस आधिक तपास करत आहेत. य या सगळ्या प्रकारानंतर सलमानच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police Special Team) विशेष टीम तयार केली आहे. दोन ज्याईंट सीपी क्राईम आणि कायदा सुव्यवस्था यांच्या नेतृत्वाखाळी ही टिम तयार करण्यात आली असून मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी सलमानशी संपर्क साधून त्याच्या सुरक्षेचा आढावा घेतलाय. सलमान खानला आलेले हेच ते धमकी पत्र आहे.

सलमान खानला आलेले हेच ते धमकी पत्र आहे.

कधी आलं आहे धमकी पत्र? रविवारी 5 जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचं पत्र मिळालं होतं. ‘सलमानचाही सिद्धू मूसेवाला करू’, अशी धमकी त्याला देण्यात आली होती. या धमकीची माहिती महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला मिळताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर क्राईम ब्राँचची ( Mumbai Crime Branch) एक टिम तात्काळ दाखल झाली आहे. ज्या ठिकाणी धमकीचं पत्र मिळालं त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. सलमान स्वत: घराबाहेर येऊन क्राइम ब्राँचच्या टिमला सहकार्य करताना दिसला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात