मुंबई, 25 मे- महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता जाहीर होणार आहे. यंदा बारावीचा निकाल 91. 25 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा निकाल 2 टक्क्यांनी कमी झाला आहे.. दरवर्षीप्रमाणे याही वर्षा मुलींना बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत यावर्षी मुलींचा निकाल 4 टक्क्यांनी जास्त आहे. कोकण विभागाने या निकालात बाजी मारली आहे तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे.
लोकप्रिय गायक, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांचा मुलगा शुभम कुलकर्णीला बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळालं आहे. शुभमने बारावीत तब्बल 89.33 टक्के गुण मिळवले आहेत. तर Philosophy विषयात त्याने 100 पैकी 96 गुण प्राप्त केले आहेत. सलील कुलकर्णींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लाडक्या लेकाचं अभिनंदन केलं आहे.
वाचा-'शिवप्रेमींच्या भावनांशी..' 'रावरंभा' सिनेमा पाहिल्यानंतर महेश टिळेकरांची पोस्ट
सलील कुलकर्णी यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शुभमसाठी खास स्टोरी शेअर केली आहे. त्यांनी लाडक्या लेकाचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, वागणार नाही वाईट साईट राखेल तुमचं नाव, माझे आईबाबा म्हणून ओळखेल तुम्हा गाव, हे शुभमने गायलेलं गाणं त्यांनी स्टोरीला दिलं आहे. “शुभमने पाच वर्षांचा असताना गायलेलं हे गाणं आठवलं, असं कॅप्शन सलील कुलकर्णी यांनी स्टोरीला दिलं आहे.
सलील कुलकर्णी यांनी यापूर्वी दहावी बारावीच्या मुलांसाठी एक व्हिडिओ पोस्ट करत सल्ल दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की,अभ्यास करा ..कष्ट करा..पण दडपण घेऊ नका.. प्रत्येक फुलाची आणि प्रत्येक मुलाची उमलयाची वेळ वेगवेगळी असते एवढं लक्षात ठेवा.. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप महत्त्वाचा आहे, तुमच्या जीवापेक्षा काहीच महत्तेवाचं नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं. हा व्हिडिओ त्यांनी आपला मुलगा शुभम याला परीक्षेला सोडायला गेल्यानंतर शेअर केला होता. गायक,संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात.त्यांच्या विविध कार्यक्रमाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देत असतात. त्यांची अनेक गाणी ही लहान मुलांना आवडतात. लहान मुलांच्यात त्यांची चांगलीच क्रेझ आहे.
कुठे पाहायचा निकाल?
बारावीचा निकाल तुम्ही mahahsscboard.in, mahresult.nic.in या वेबसाईटवर पाहू शकता. याशिवाय News18Lomat च्या साईटवरही निकाल पाहू शकता. त्यामुळे निकालाच्या वेबसाईटच सर्व्हर डाऊन असेल तरी तुम्हाला तुमचा निकाल बघता येणार आहे. यासाठी तुम्हाला आधी वेबसाईटवर रजिस्टर करावं लागणार आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या ऑनलाईन साईटवर mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहू शकता. याशिवाय SMS द्वारे देखील तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. मेसेज अॅपमध्ये जाऊन तुम्हाला "MHHSC" नंतर एक स्पेस टाइप करा. तुम्हाला तुमचा रोल नंबर लिहायचा आहे. तो टाइप करुन झाल्यावर 57766 SMS सेंड वर क्लिक करा. तुम्हाला निकाल SMS द्वारे कळवण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.