'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतील सूर्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने (Annapurna Vitthal) या मालिकेच्या निर्मात्याविरूद्ध व सहकलाकारांविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली होती. एका पोर्टलने यासंबंधी माहिती दिली होती. तसेच त्यांनी देखील यूट्यूबवर यासंबंधी एक व्हिडीओ शेअर केला होता. याविषयी मालिकेच्या निर्मात्याकडून कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र अन्नपूर्णा विठ्ठल यांनी यासंबंधी एक व्हिडीओ शेअर केला होता. 22 नोव्हेंबर रोजी त्यांनी दादर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. त्यांच म्हणणं आहे की, सेटवर त्यांना इतका त्रास देण्यात आला की त्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. आता या सर्व प्रकारानंतर मालिकेतील अभिनेता सुनील बर्वे यांनी आपली महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, 'मी या इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षांपासून काम करत आहे. परंतु अशी कोणतीच घटना माझ्यासोबत घडली नाही. पण मला माहिती नाही त्या का अशा अफवा पसरवून सिम्पथी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपल्या इच्छेने हि मालिका सोडली होती. मग आता त्या का अशा गोष्टी पसरवत आहेत. माहिती नाही त्यांनी का सहा प्रकारचा व्हिडीओ बनवला आहे'. असं म्हणत सुनील बर्वे यांनी अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या आरोपांना फेटाळून लावलं आहे. अन्नपूर्णाने आरोप केला आहे की तिच्यावर इतका अत्याचार झाला की तिने ऑगस्टमध्ये मालिका सोडली. 28 ऑगस्ट रोजी दिग्दर्शक भरत गायकवाड यांनी त्यांचा प्रचंड छळ केला. एकदा मेकअप दादा मेकअप करत होते तेव्हा घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या. त्याने पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले तेव्हा प्रॉडक्शन हेड कुमार यांनी हात जोडून त्याला असे करू नका अन्यथा प्रॉडक्शनचे नाव खराब होईल असे सांगितले..असं अनेक आरोप त्यांच्याकडून करण्यात आले आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment