मुंबई, 29 मार्च: आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने टीव्ही आणि रंगभूमी दोन्हीवर 'हवा' निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सागर कारंडे (Sagar karande). चला हवा येऊ द्या (chala hawa yeu dya) या लोकप्रिय शोमधला सागर करत असलेल्या विविधांगी भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. स्त्रीपात्र असो वा पोस्टमनसारखं भावुक करणारं पात्र सागर ते तितक्याच ताकदीने हुबेहूब उभं करतो आणि ते प्रत्येक वेळी उस्फूर्त वाटतं. पण सागरचा आजपर्यंतचा प्रवास सहज सोपा नव्हता. नाटक करून काय होणार, पोट कसं भरणार असं म्हणणाऱ्या समाजात घरच्यांच्या पाठबळावर संघर्ष केला, असं सागर (Sagar karande struggle marathi entertainment) सांगतो.
नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सागरने त्याच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये पत्नीचं स्थान किती महत्त्वाचं ठरलं हे सांगितलं. त्या वेळी त्यानं सांगितलेला किस्सा डोळ्यात पाणी आणणारा आहे. नाटक करायला म्हणून झपाटलेला असताना आई-वडिलांना मात्र कोणी विचारलं काय करतो, तर मान खाली घालावी लागायची. कारण तेव्हा काहीच जम बसला नव्हता, असं सागर सांगतो.
झी 24 तासशी बोलताना सागरने सांगितलं, "त्या वेळी मुलगा नाटक करतो, हे सांगताना आई-वडिलांची मान खाली जायची. कारण त्यातून फारसं काहीच साधत नव्हतं. नाटकाच्या एका प्रयोगाचे 200 रुपये मिळायचे आणि फार फार तर 6 प्रयोग महिन्याभरात लागायचे. ही एवढीच कमाई."
View this post on Instagram
सागर त्या वेळची परिस्थिती सांगताना भावुक झाला. "त्यात लग्नासाठी मुली बघणं सुरू होतं. मुलगा किती कमावतो, हा पहिलाच प्रश्न असतो. नाटकवेड वगैरे ठीक आहे, पण कमावतो किती या प्रश्नावर सगळं थांबायचं."
पाहा देवमाणूसमधील मायराचं बॉलिवूड कनेक्शन; सलमान-वरुणसोबत केलंय काम
बायकोबद्दल बोलताना सागर सांगतो, "अवघ्या 1200 रुपये महिना कमावणाऱ्या मुलाशी लग्न करायला ती तयार झाली. नुसती तयार झाली नाही, तर तुम्ही तुम्हाला हवं तेच करा मी पाठिशी खंबीरपणे उभी राहीन, हा विश्वास तिने पहिल्या काही भेटीतच दिला. आजही ती तो निभावते आहे."
View this post on Instagram
सागरच्या सोशल मीडिया हँडल्सवर त्याचे फॅमिली फोटो, पत्नीबरोबरचे अनेक फोटो दिसतात. वर्षाच्या सुरुवातीला बायकोच्या मागे बाइकवर बसून केलेला VIDEO असो किंवा सणा-समारंभाचे फोटो सागरच्या सोशल हँडवरून त्याच्यातला फॅमिली मॅन नेहमीच दिसत असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.