मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर सचिन तेंडुलकर नेहमीच चर्चेत असतो. तसेच त्याची मुलेसुद्धा चर्चेत असतात.
सचिनची मुलगी सारा तेंडुलकर जोरदार चर्चेत आली आहे. कारण साराने नुकतंच मॉडेलिंगमध्ये पदार्पण केलं आहे.
साराने काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ म्हणजेच एक ऍड आहे.
यामध्ये साराने अभिनेत्री बनिता संधू आणि अहान शेट्टीची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत एका कपड्यांच्या ब्रँडसाठी जाहिरात केली आहे.
व्हिडीओ शेअर करताच काही वेळेतच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच यावर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
सारा तेंडुलकर एखाद्या अभिनेत्री इतकीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. त्यामुळे तिचा एक खास चाहतावर्ग आहे.