बिग बींच्या पुढे गेला सचिन, बाॅक्स आॅफिसवर पहिल्याच दिवशी रेकाॅर्ड

बिग बींच्या पुढे गेला सचिन, बाॅक्स आॅफिसवर पहिल्याच दिवशी रेकाॅर्ड

पहिल्याच दिवशी ८.४० कोटींची कमाई केली. आणि बिग बींच्या सरकार 3ला मागे टाकलं.

  • Share this:

28 मे : सचिनचा सिक्स, प्रेक्षकांचा एकच गोंगाट. सचिन आऊट, प्रेक्षकांमध्ये सन्नाटा. हे दृश्य आहे 'सचिन-अ बिलियन ड्रीम्स' सिनेमाच्या थिएटर्सचं. हा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय. इतका की सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा रेकॅार्ड बनवला. पहिल्याच दिवशी ८.४० कोटींची कमाई केली. आणि बिग बींच्या सरकार 3ला मागे टाकलं. सरकारची 3ची पहिल्या दिवशीची कमाई होती फक्त 2 कोटी रुपये. आणि 19 मेपर्यंत ही कमाई जेमतेम पोचली 32.24 कोटी.

अलिकडे रिलीज झालेले 'हिंदी मीडियम'ची पहिल्या दिवशीची बाॅक्स आॅफिस कमाई होती 2.81 कोटी, तर मेरी प्यारी बिंदूनं पहिल्या दिवशी 1.75 कोटींचा गल्ला जमवला होता. त्याचं गाणं सिनेमापेक्षा जास्त हिट झालेलं

थिएटरमध्ये 'सचिन सचिन'चा नारा अजून बराच काळ ऐकायला मिळणारेय. आणि क्रिकेटप्रमाणे सिनेमातही सचिन रेकार्डस् करणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2017 06:59 PM IST

ताज्या बातम्या