Home /News /entertainment /

'Sooryavanshi' नंतर 'Singham 3' च्या तयारीत रोहित शेट्टी; जाणून घ्या चित्रपटाच्या सर्व डिटेल्स

'Sooryavanshi' नंतर 'Singham 3' च्या तयारीत रोहित शेट्टी; जाणून घ्या चित्रपटाच्या सर्व डिटेल्स

रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) या चित्रपटाच्या यशानंतरच 'सिंघम 3' (Singham 3) ची चर्चा सुरू झाली आहे. 'सिंघम' आणि 'सिंघम रिटर्न्स'च्या यशानंतर रोहित शेट्टी पुन्हा एकदा प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 नोव्हेंबर-   रोहित शेट्टीच्या  (Rohit Shetty)  'सूर्यवंशी'  (Sooryavanshi)  या चित्रपटाच्या यशानंतरच 'सिंघम 3' (Singham 3)  ची चर्चा सुरू झाली आहे. 'सिंघम' आणि 'सिंघम रिटर्न्स'च्या यशानंतर रोहित शेट्टी पुन्हा एकदा प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. अजय देवगण आणि रोहित शेट्टी 'सिंघम 3' चित्रपटाचे शूटिंग काश्मीरच्या खऱ्या लोकेशनवर करणार आहेत. चित्रपटात अजय देवगण (सिंघम) शांततेसाठी राष्ट्रविरोधी घटकांशी लढताना दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या यशानंतर 'सिंघम 3'ची चर्चा सुरू झाली आहे. 'सिंघम ३' बद्दल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. 'सिंघम 3' हा पोलिस कॉप मालिकेचा एक भाग असल्याचे मानले जात होते. चित्रपटाच्या ड्राफ्टवर काम सुरू असून निर्माते पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये हा प्रोजेक्ट सुरू करण्याच्या तयारीत आहेत.'सिंघम 3'च्या कथेचे तार सूर्यवंशीशी जोडले जातील. सत्यकथा जोडून हा चित्रपट बनवला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, सिंघम 3 ची कथा सूर्यवंशी जिथे संपली तिथून सुरू होईल. सिंघमच्या क्लायमॅक्समध्ये रणवीर सिंग आणि अक्षय कुमारही अॅक्शन करताना दिसणार आहेत. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. 'सिंघम 3'च्या संकल्पनेबद्दल प्रेक्षक आधीच उत्सुक आहेत. रोहित शेट्टीला त्याच्या विश्वातील लोहपुरुषाला आणखी वेगळ्या उंचीवर न्यायचे आहे. रोहित शेट्टीने याआधी 'सिंघम' आणि 'सिंघम रिटर्न्स'चे दिग्दर्शनही केले आहे. सिंघम 3 साठी रोहित शेट्टी अनेक कल्पनांवर काम करत असल्याच्याही बातम्या येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2023 च्या स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊ शकतो. रोहित शेट्टी नेहमीप्रमाणे लवकरच काश्मीर, दिल्ली आणि गोव्यात या चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. सिंघम 3 ची संकल्पना कलम 370 वर आधारित असेल. काश्मीरमधील कलम 370 हटवण्यावर एक चित्रपट बनवला जाईल. 'सिंघम 3'चे शूटिंग सुरू करण्यापूर्वी रोहित शेट्टी रणवीर सिंगसोबत त्याचा कॉमेडी चित्रपट 'सर्कस' पूर्ण करणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंगची दुहेरी भूमिका आहे. (हे वाचा:रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'Sooryavanshi' झाला Leak! रोहित शेट्टीला बसू ... ) नुकताच रोहित शेट्टीचा अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) स्टारर 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहे उघडल्यानंतर प्रदर्शित होणारा 'सूर्यवंशी' हा एक मोठा चित्रपट आहे. सूर्यवंशीला महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांत चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळले आहेत. 'सूर्यवंशी' आंतरराष्ट्रीय स्तरावर 66 देशांमध्ये 1300 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. या देशांमध्ये उत्तर अमेरिका, यूएई, ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीन सारख्या इतर अनेक देशांचा समावेश आहे. हा एक विक्रम आहे. 'सूर्यवंशी' भारतात 4 हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.पहिल्याच दिवशी या चित्रपटाने नवा विक्रम करत २६ कोटींचा गल्ला जमवला होता.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Rohit Shetty

    पुढील बातम्या