रणवीर आणि रणबीरला एकत्र घेऊन रोहित शेट्टीचा धमाकेदार प्लॅन

रणवीर आणि रणबीरला एकत्र घेऊन रोहित शेट्टीचा धमाकेदार प्लॅन

रणवीरची अॅक्शन आपण अनेकदा पाहिलीय. पण त्याला आता काॅमेडी सिनेमा करायचाय.

  • Share this:

मुंबई, 29 डिसेंबर : रणवीरचा सिंबा रिलीज झाला. रणवीरच्या भूमिकेचं सगळीकडे कौतुक होतंय. रणवीरची अॅक्शन आपण अनेकदा पाहिलीय. पण त्याला आता काॅमेडी सिनेमा करायचाय. त्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

रणवीरला 'अंदाज अपना अपना' सिनेमाचा रिमेक व्हावा, अशी इच्छा आहे. आणि त्याची इच्छा त्याचा मित्र आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीनं उचलून धरलीय. पिंकविलाच्या बातमीनुसार रोहित शेट्टी म्हणाला, ' अंदाज अपना अपना सिनेमा एक टाइमलेस सिनेमा आहे. तो करणं एक मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी रणवीर आणि रणबीर ही जोडी परफेक्ट असेल.'

रोहित पुढे म्हणाला, रणबीर माझा आवडता कलाकार आहे. तो माझी नेहमीच पसंती राहिलाय.'

रणवीर मागे एकदा म्हणाला होता, की काॅमेडी सिनेमासाठी चांगलं स्क्रीप्ट हवं. पण आता तो असंही म्हणतोय, की अंदाज अपना अपना हा एक चांगला चाॅइस असेल. आणि त्याला तो सिनेमा करायला आवडेल.

सगळीकडे सिंबा रिलीज झाला. प्रेक्षक, समीक्षक यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतायत. पण महत्त्वाची प्रतिक्रिया होती ती रणवीरच्या होम मिनिस्टरची. लग्नानंतरचा रणवीरचा हा पहिलाच सिनेमा.

रणवीर सिंग आपल्या अख्ख्या टीमला घेऊन सिंबा पाहायला पोचला होता. त्यात दीपिकाही होती. नंतर मीडियाशी बोलताना रणवीरला विचारलं, दीपिकाला सिनेमा कसा वाटला? त्यावर रणवीर म्हणाला, माझ्या बायकोला रोहित शेट्टीबरोबर माझाही अभिमान वाटला.

रणवीर म्हणाला, की सिनेमा संपल्या संपल्या दीपिकानं रोहितचं अभिनंदन केलं. रणवीर-दीपिकाच्या लग्नानंतर रणवीर सिंबाच्या प्रमोशनमध्ये बिझी झाला. त्यामुळे ते हनिमूनला जाऊ शकले नाहीत.

First published: December 29, 2018, 11:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading