बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या खास कॉप सीरिजसाठी ओळखला जातो. सिंघम, सिंबा आणि आता सूर्यवंशी… रोहितनं त्याच्या सिनेमातून नेहमीच एक सच्चा पोलीस ऑफिसर साकारला.
पण आता सिनेमातल्या नाही तर समाजाच्या सेवेसोठी रात्रंदिवस झटत असलेल्या खऱ्याखुऱ्या हिरोंसाठी रोहित धावून आला आहे.
मुंबईत कोरोना वॉरियर्स म्हणून दिवसरात्र काम करणा-या पोलिसांसाठी रोहित शेट्टीने आठ हॉटेल्समध्ये नाश्ता, जेवणाची सोय केली आहे.
सिंघम असो, सिंबा असो वा सूर्यवंशी..रोहित शेट्टीच्या या सिनेमांसाठी अनेक पोलिसांनी रोहित शेट्टीला नेहमीच मदत केली आहे.
कोरोनाच्या या संकटात पोलिस अहोरात्र मेहनत करत असताना रोहित शेट्टी त्यांच्यामागे उभा राहिला आहे आणि त्याने मदतीचा हात दिला आहे.