11 आॅगस्ट : ‘जग्गा जासूस’ सिनेमा फ्लाॅप झाला. तसं ऋषी कपूरनं अनुराग बासू आणि संगीतकार प्रीतमला धारेवर धरलंय. ऋषी कपूर यांच्या मते, ‘अनुराग बासू केअरलेस माणूस आहे. त्याच्यामुळे सिनेमा फ्लाॅप झालाय.’ पण यावर रणबीर कपूरचं म्हणणं वेगळंच आहे. तो म्हणतो, ‘माझे वडील इमोशनल आहेत. मला प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी असं म्हटलंय. मी त्यांच्याशी सहमत नाही. ’ रणबीर या सिनेमाकडे अपयश म्हणून बघत नाहीय. तो म्हणतोय, ’ या सिनेमावर तीन वर्ष काम केलंय. मला माहीत आहे आम्ही काय करतोय ते. अनुराग बासूसोबत काम करणं एक चांगला अनुभव आहे.’ या सिनेमात गोविंदाची भूमिका कापली गेली. यावरही ऋषी कपूरनं आक्षेप घेतलाय. तो म्हणतो,‘भूमिका कापायची होती तर गोविंदाला बोलावलंच कशाला?’ हा सिनेमा बाॅक्स आॅफसवर फ्लाॅप तर झालाय, पण वडील-मुलामधले मतभेदही याने उघड झालेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.