बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले आणि सुशांतचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.
आज अभिनेता सुशांत राजपूतच्या निधनाला तब्बल दोन वर्षे झाली आहेत. आजच्या दिवशी म्हणजेच १४ जून २०२० रोजी सुशांत त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.
या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र त्यांनतर या प्रकरणाची सीबीआई चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
यांनतर समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रियाला तुरुंगवास झाला होता. सध्या ती जामिनावर बाहेर आहे. मात्र आजही सुशांतचे चाहते तिला प्रचंड ट्रोल करतात.