बॉलिवूडच्या काही अभिनेत्री फिल्मी करिअर पेक्षा त्यांच्या कॉन्ट्रोवर्सीमुळेच जास्त चर्चेत राहिल्या आहेत. यापैकीच एक आहे अभिनेत्री रिया चक्रवर्ती. रिया मागच्या काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूतसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. याशिवाय तिचे महेश भट यांच्यासोबत काही फोटो व्हायरल झाल्यानं ती वादात सापडली होती.
सुशांतनं आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी रियाची कसून चौकशी केली. रिया सुशांतच्या सर्वांत जवळच्या व्यक्तींपैकी एक होती आणि हे दोघं नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं.
दरम्यान सुशांतच्या आत्महत्येनंतर रियाचे महेश भट यांच्यासोबत काही फोटो व्हायरल झाले होते. ज्यामुळे ती वादच्या भोवऱ्यात सापडली होती.
सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या चाहत्यांनी याबाबत चौकशीची मागणी केल्यानंतर तेव्हा कुटुंबीयांसमवेत रियाची सुद्धा चौकशी झाली.
रिया चक्रवर्ती तिचा सिनेमा जलेबी सिनेमाच्या रिलीजवेळी सुद्धा खूप चर्चेत राहिली होती. कारण होतं या सिनेमाचं पोस्टर ज्यावर रिया ट्रेनच्या खिडकीतून तिच्या सह-अभिनेत्याला किस करताना दिसली होती. ज्यावर मीम्स सुद्धा व्हायरल झाले होते.
रियानं 2013 मध्ये 'मेरे डॅड की मारूती' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात ती साकिब सलीमसोबत दिसली होती. तसेच राम कपूर यांचीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका होती.
रियानं 7 वर्षांच्या बॉलिवूड कारकिर्दीत तिनं काही सिनेमांत सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. ज्यात 'दोबारा' 'हाफ गर्लफ्रेंड' या सिनेमांचा समावेश आहे. लवकरच ती अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत 'चेहरे' या सिनेमात दिसणार आहे.