मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘आता कोणाच्या पैशांवर मजा मारतेयस?’; विमानतळावर रियाला पाहून प्रेक्षक संतापले

‘आता कोणाच्या पैशांवर मजा मारतेयस?’; विमानतळावर रियाला पाहून प्रेक्षक संतापले

‘आता कोणाला लुबाडते आहेस?’; विमानतळावर पोहोचताच रिया चक्रवर्तीवर सुरु झाला टीकेचा वर्षाव

‘आता कोणाला लुबाडते आहेस?’; विमानतळावर पोहोचताच रिया चक्रवर्तीवर सुरु झाला टीकेचा वर्षाव

‘आता कोणाला लुबाडते आहेस?’; विमानतळावर पोहोचताच रिया चक्रवर्तीवर सुरु झाला टीकेचा वर्षाव

मुंबई 16 एप्रिल: अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळं (Sushant Singh Rajput death case) अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. ती सुशांतची गर्लफ्रेंड होती. चित्रपटांमुळं तिला जितकी प्रसिद्धी मिळाली नाही त्यापेक्षा कैकपटीनं सुशांत प्रकरणामुळं ती चर्चेत आली. सुशांतच्या मृत्यूसाठी चाहते तिला जबाबदार धरत आहेत. अर्थात हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. परंतु ती जिथे जाईल तिथं तिला टीकेचा सामना करावा लागत आहे, अशीच काहीशी घटना मुंबई विमानतळावर घडली. या ठिकाणी रियाला पाहून आता आणखी कोणाला लुबाडणार आहेस? असे सवाल तिला प्रेक्षकांनी केले.

रिया चक्रवर्ती मुंबईतून बाहेर जाण्यासाठी एअरपोर्टवर गेली होती. त्यावेळी तिनं तोंडावर मास्क आणि अत्यंत साधे कपडे परिधान केले होते. परंतु त्याही वेशात तेथील प्रेक्षकांनी तिला ओळखलं. अन् तिच्यावर टीकेची झोड सुरु केली. “आता कोणाला लुबाडणार आहेस? कोणाच्या पैशांवर मजा मारतेयस? खोटं बोलताना तुला लाज वाटत नाही का?” अशा आशयाचे टोमणे तिला मारले गेले. तिचा हा एअरपोर्टचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर देखील व्हायरल होतोय. तिथंही तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

सुशांत प्रकरणात रियाची अद्याप निर्दोष सुटका झालेली नाही. या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. एनसीबीनं न्यायालयासमोर 30 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः हे आरोपपत्र सादर केलं. या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासोबतच आणखी 30 जणांनी नावं आहेत. शिवाय या प्रकरणी काही ड्रग्ज पेडलर्सला देखील एनसीबीनं अटक केली आहे.

First published:

Tags: Entertainment, Rhea chakraborty, Sushant Singh Rajput, Sushant singh rajput case