Criminal Justice 2 Review : संथ आणि रटाळवाणा कोर्टरूम ड्रामा

Criminal Justice 2 Review : संथ आणि रटाळवाणा कोर्टरूम ड्रामा

क्रिमिमल जस्टीसचा पहिला सिझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. क्रिमिनल जस्टिस 2 चा (Criminal Justice 2) विषय अतिशय दमदार आहे. पण तो हाताळण्यात लेखक, दिग्दर्शक अपयशी ठरलेले आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर : क्रिमिनल जस्टीस (Criminal justice-behind closed doors) या वेबसिरीजच्या पहिल्या भागात पती पत्नीचं नातं कसं असतं हे दाखवण्यात आलं होतं. साधारणपणे बेडरूममध्ये पती पत्नींमध्ये घडणाऱ्या गोष्टींवर भाष्य केलं जात नाही. परंतु अनेकदा बेडरूममधल्या काही गोष्टी बाहेर येत असतात. क्रिमिनल जस्टीस( (Criminal justice ) या सिझनमध्ये पत्नीने पतीवर केलेल्या चाकू हल्ल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती दाखवण्यात आली आहे. यामध्ये पतीची भूमिका जिशु सेनगुप्ता (Jisshu Sengupta) यांनी केली आहे. तर पत्नीची भूमिका कीर्ति कुल्हारी (Kirti Kulhari) यांनी केली आहे. पतीने जबरदस्ती केल्यानंतर पत्नीने त्याला चाकूने भोसकून मारल्यानंतर कोर्टात काय होते आणि यामध्ये पत्नी कोणती भूमिका मांडते हे दाखवण्यात आले आहे. या सीरिजच्या सुरुवातीपासूनच दिग्दर्शक प्रेक्षकांना गुंगवत ठेवतो. सीरिजच्या पहिल्या भागात कीर्ति कुल्हारी यांच्या शानदार अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. लेखक अपूर्व असरानी (Apoorv Aasrani) आणि रोहन सिप्पी-अर्जुन मुखर्जी (Rohan Sippy- Arjun Mukerjee) या दिग्दर्शकांची जोडी केवळ अनु या पात्राशीच ही कथा केंद्रित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आता दुसऱ्या भागात कोर्टातील प्रकरणात काय घडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं होतं. या भागात पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या वकिलाच्या भूमिकेत होते.

परंतु या दुसऱ्या भागात सिरीज थोडी स्लो होताना दिसते. कोर्टात आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर अनु म्हणजेच कीर्ति कुल्हारी (Kirti Kulhari) कोणतंही स्पष्टीकरण देत नाही. कोर्टात अतिशय शांत उभी राहून आपल्या बचावासाठी काहीही बोलत नाही. त्यामुळे ही अतिशय सोपी केस असल्याचे विरोधी वकील बोलतात. पण यामध्ये वकील माधव मिश्रा म्हणजेच पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांची एंट्री होते. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आपल्या शानदार अभिनयासाठी ओळखले जातात. परंतु या सिरीजमध्ये त्यांच्या वकिलाच्या पात्राला हवे तितके वजन पेलण्यास अपयश आलेलं आहे. आपल्या गमतीदार स्वभावामुळं हे पात्र रंगवण्यास त्यांना मदत झाली आहे. या पात्राला देखील तसेच दाखवण्यात आल्यानं त्यांना याचा फायदा झाला आहे. परंतु समोरून त्यांना हवा तसा प्रतिसाद नसल्यानं त्यांचे पात्र अतिशय स्लो झाल्याचं यामध्ये दिसून येते. अनुराधा म्हणजेच कीर्ति कुल्हारी यांचे पात्रदेखील सतत एकाच कक्षेत असल्यानं काही वेळानंतर प्रेक्षकांना त्याचा कंटाळा येतो. त्यामुळं हे रटाळ वाटायला लागते.

पंकज त्रिपाठी(Pankaj Tripathi) यांच्याकडून असलेल्या अपेक्षा देखील यामध्ये पूर्ण होताना दिसत नाहीत. यामध्ये केवळ नवीन पात्राच्या एन्ट्रीने थोडी मजा आणली असून वकील मिश्रा यांच्या पत्नीच्या एन्ट्रीने थोडावेळ मनोरंजन होते. खुशबू अत्रे (Khushboo Atre) यांनी अतिशय गमतीदार ही भूमिका उत्तमप्रकारे साकारली आहे.  परंतु त्यानंतर पुन्हा तेच होत असल्यानं सिरीज वेग पकडत नाही. त्यामुळं दिग्दर्शकाला आणि लेखकाला यामधून जे काही सांगायचं आहे त्यामध्ये तो यशस्वी होताना दिसून येत नाही. या वेब सीरिजला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्ही पंकज त्रिपाठी(Pankaj Tripathi) यांचे चाहते असाल तर एकदा ही सिरीज पाहू शकता. रटाळवाण्या आणि स्लो कहाणीमुळं प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यास दिग्दर्शकाला यामध्ये अपयश आलं आहे. यामधून तुमचे अतिशय कमी मनोरंजन होणार असून तुम्ही पहिला भाग बघितला असल्यास उत्सुकता म्हणून दुसरा भाग बघू शकता.

कलाकारः पंकज त्रिपाठी, अनुप्रिया गोयंका, कीर्ति कुल्हारी, खुशबू अत्रे

दिग्दर्शक: रोहन सिप्पी आणि अर्जुन मुखर्जी

Rating: 1.5/5

Published by: Amruta Abhyankar
First published: December 24, 2020, 2:55 PM IST

ताज्या बातम्या