Home /News /entertainment /

2019 मध्ये झालेल्या 'त्या' पार्टीची पुन्हा चौकशी; करण जोहर याला NCB कडून समन्स जारी

2019 मध्ये झालेल्या 'त्या' पार्टीची पुन्हा चौकशी; करण जोहर याला NCB कडून समन्स जारी

करन जोहर यांच्या घरी आयोजित पार्टीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

    मुंबई, 17 डिसेंबर : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) करण जोहरला समन्स पाठवला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करन जोहरला (karan Johar) एनसीबी मुंबईने चौकशीसाठी बोलावले आहे. एनसीबीचं म्हणणं आहे की, करन जोहर यांच्यावर कोणत्याही प्रकरणात संशय नाही. ड्रग्जशी संबंधित काही माहिती मिळविण्यासाठी त्यांना बोलावण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करन जोहर यांना स्वत: NCB वर हजर होण्याची गरज नाही. ते आपल्या प्रतिनिधीला तेथे पाठवू शकतात. करन जोहर यांना त्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांबाबत माहिती द्यावयाची आहे, ज्याचा उपयोग 2019 मध्ये आयोजित पार्टीत शूट करण्यासाठी करण्यात आला होता. करन जोहर यांना बुधवारी समन्स पाठविण्यात आलं आहे. त्यांना 2019 मध्ये झालेल्या पार्टीशी संबंधित सर्व रेकॉर्ड शेअर करावे लागतील. उदा. पार्टीत कोण कोण सहभागी होते..कोणत्या कॅमेऱ्याने व्हिडीओ शूट केला होता. आदी माहिती शुक्रवारी 18 डिसेंबरपर्यंत पाठविण्यास सांगण्यात आलं आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर करन जोहर यांच्या अडचणीत वाढ झाली होती. करन जोहर यांच्या घरी आयोजित पार्टीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सांगितले जात आहे की, करन जोहरने हा व्हिडीओ शूट केला होता आणि या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा, रणबीर कपूर, विक्की कौशल, वरुण धवन, शकून बत्रा, जोया अख्तर, अर्जुन कपूर, अयान मुखर्जी, दीपिका पादुकोन आणि कार्तिक आर्यन सारख्या कलाकारांचा सहभाग होता. त्यावेळी अशी चर्चा सुरू होती की एनसीबीकडून करन जोहर आणि या व्हिडीओमधील कलाकारांवर कारवाई केली जाईल. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अकाली दलाचे नेता मनजिदंर सिंह सिरया यांनी एनसीबीमध्ये तक्रार दाखल केली होती. मनजिंदर सिंह सिरसा यांनी करन जोहर याला बॉलिवूड ड्रग्ज कार्टेलचा किंग असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी करन जोहरने स्पष्टीकरण दिलं होतं. यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की, मी ड्रग्ज घेत नाही आणि प्रमोटही करीत नाही. माझ्या घरी 28 जुलै 2019 मध्ये झालेल्या पार्टीत ड्रग्ज घेतल्याच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहे. मी 2019 मध्येच सांगितलं होतं की या सर्व बातम्या खोट्या आहेत. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने करन जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शनचे कार्यकारी प्रॉड्यूसर क्षितिज प्रसाद याला ताब्यात घेतलं होतं. क्षितिजला अटकेत घेतल्यानंतर करनने स्पष्टीकरण दिलं होतं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bollywood, Drugs, Karan Johar

    पुढील बातम्या