मुंबई, 15 जुलै- प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन झालं आहे.मावळच्या तळेगाव दाभाडील आंबी येथील घरात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. रवींद्र यांचं वय 77 वर्ष होतं. त्यांचा मृत्यू साधारण: तीन दिवसांपूर्वी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. लोकप्रिय अभिनेत्याचा असा शेवट झाला आहे, हे खूपच वेदनादायी आहे. रवींद्र महाजनी यांचा गश्मिर महाजनी हा एकुलता एक मुलगा आहे. तो देखील चित्रपट क्षेत्रात आघाडीचा अभिनेता आहे. या बाप लेकाच्या जोडीनं एका बॉलिवूड सिनेमात एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा रविंद्र महाजनी यांचा शेवटचा सिनेमा ठरला आहे. वाचा-मराठीतील हँडसम हंक अभिनेत्याचा घरात तीन दिवस मृतदेह होता पडून, असा मिळाला होता पहिला ब्रेक रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी, गुजराती सिनेमांमध्येही केलंय काम रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी, गुजराती सिनेमांमध्येही काम केलं आहे. रविंद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ यांसारख्या सिनेमात काम केलं. इतकंच नाही तर बॉलिवूडमध्येही ते झळकले आहेत. हा ठरला शेवटचा सिनेमा आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या सिनेमातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या सिनेमात मुलगा गश्मिर महाजनी याने देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. या सिनेमामुळं या बाप लेकाच्या जोडीला एकत्र काम करता आलं. सिनेमातील दोघांचाही लूक अप्रितम असा होता. गश्मिरनं त्याचा लूक सोशल मीडियावर शेअर केला होता.
80 चा काळ गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे रविंद्र महाजनी, त्याकाळी मराठीतील हँडसम हंक म्हणून रविंद्र महाजनी यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांचा मुलगा देखील त्यांच्या इतकाच देखणा आहे. ही बाप लेकाची जोडी मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जायची.