News18 Lokmat

रवी जाधव घेऊन येतायत तरुणाईचा 'यंटम'!

समीर आशा पाटील दिग्दर्शित 'यंटम' ही टीनएजमधली रिफ्रेशिंग आणि म्युझिकल लव्हस्टोरी अाहे. २ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आणि रवी जाधव या सिनेमाची प्रस्तुती करतायत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 15, 2017 05:05 PM IST

रवी जाधव घेऊन येतायत तरुणाईचा 'यंटम'!

15 डिसेंबर : 'यंटम' हा तरुणाईचा सिनेमा. ही एक टीनएजमधली रिफ्रेशिंग आणि म्युझिकल लव्हस्टोरी. 2 फेब्रुवारीला सिनेमा रिलीज होतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे रवी जाधव तो प्रस्तुत करतायत. समीर आशा पाटीलनं सिनेमा दिग्दर्शित केलाय.

रवी जाधव यांनी यापूर्वी अभिजित पानसे दिग्दर्शित 'रेगे' आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित 'कॉफी आणि बरंच काही' हे दोन चित्रपट प्रस्तुत केले होते. अतिशय वेगळ्या धाटणीचे हे चित्रपट प्रेक्षकांच्याही पसंतीला उतरले. आता "यंटम" हे आगळंवेगळं नाव असलेला नवा चित्रपट रवी जाधव प्रस्तुत करत आहेत त्यामुळे या चित्रपटाविषयीचं कुतूहल वाढलं आहे. अनेक अनेक हिट गाणी दिलेल्या चिनार-महेश या जोडीने या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.

Loading...

चित्रपट प्रस्तुत करण्याबद्दल रवी जाधव म्हणाले, '२०१७ ला कच्चा लिंबूमध्ये अभिनय व न्यूड ( चित्रा ) या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. हे दोन्ही चित्रपट अत्यंत वेगळ्या धाटणीचे व साकारायला आव्हानात्मक होते.  २०१८ हे वर्ष मात्र माझ्यासाठी एकदम वेगळे असणार आहे. या वर्षी काही सहज, सोप्या, सामान्य माणसांच्या स्वप्नांच्या कथा, तर काही असामान्य कर्तृत्व गाजवलेल्या प्रेरणादायी कथा लोकांसमोर आणायचा मानस आहे. ‘यंटम’ हे त्यातलेच पहिले पाऊल.

‘यंटम’ म्हणजेच वेडेपणा. आजच्या  ग्रामीण महाराष्ट्रातील तरूणांची अत्यंत तरल प्रेमकथा, ज्यात दाहक वास्तवतेचा पदर आहे आणइ प्रेमात काहीही करण्याचा वेडेपणा आहे.'

सिनेमात सयाजी शिंदेंचीही भूमिका आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 04:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...