मुंबई, 21 डिसेंबर: माझ्या नवऱ्याची बायको (Majha Navryachi Bayko) या मालिकेतील शनाया आपल्यापैकी अनेकांची आवडती अभिनेत्री आहे. तिचा बोल्ड लूक, मालिकेत दाखवला जाणारा मस्तीखोर पण प्रेमळ स्वभाव, अभिनय यामुळे अनेक चाहते तिच्या प्रेमात आहेत. पण रसिकाच्या आयुष्यात सध्या अशी घटना घडली आहे ज्यामुळे ती अतिशय दु:खी आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या आजीचं निधन झालं. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत रसिकाने आपल्या दु:खाला वाट मोकळी करुन दिली आहे.
काय आहे रसिकाची पोस्ट?
लहानपणीची अशी एकही आठवण नाही ज्यात आजी नाही. माझे बाबा यूएसला असायचे. आई मी आज्जी, यश (माझा भाऊ) आणि आजोबा हे सगळे घरी राहायचो. मी बाळ असताना मला अंघोळ घालून प्रत्येक आरशात ‘हा पाहा बाळ’ असं म्हणून माझाच चेहरा दाखवून मला हसवणारी आजी, शाळा सुरू झाल्यावर मी झोपेतून उठल्यानंतर मला थेट बाथरुममध्ये नेऊन ठेवणारी, तुझी दुपारची शाळा कधी सुरू होणार असं विचारणारी, गरम गरम जेवायला वाढणारी, घरात सतत काम करणारी, कधीही न थकणारी, रात्री अनेक गोष्टी सांगणारी, गाणी शिकवणारी, अतिशय उत्तम गाणारी, आम्ही कीर्तनावरुन आलो की अध्यात्म आणि विज्ञान याची किती गोड सांगड आहे यावर चर्चा करणारी माझी आई (आजी) काही दिवसांपूर्वी वारली. आजी तुझं अचानक निघून जाणं मनाला चटका लावून देलं आहे. अपघात हे तुझ्या जाण्याचं कारण चुकीचं होतं. तुझी आठवण खूप येतेय. तुझ्या आत्माला शांती लाभो. अशी पोस्ट तिने लिहीली आहे.
View this post on Instagram
पोस्टर गर्ल या मराठी चित्रपटातून तिने अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पण माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. अभिनेत्री रसिका सुनीलने भरनाट्यमचं शिक्षण घेतलं आहे. तसंच तिला बुलेट चालवायलाही आवडते. रसिकाने काही जाहिरातींमध्येही काम केलं आहे.