मुंबई, 30 एप्रिल- ‘कस्तुरी’, ‘उतरन’ आणि यांसारख्या टीव्ही मालिकांमधून प्रचंड लोकप्रिय झालेला अभिनेता आणि रश्मी देसाईचा एक्स पती म्हणजे नंदीश संधू होय. नंदिश सध्या ‘जुबली’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आला होता. दरम्यान अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नंदिशचा धाकटा भाऊ ओंकार सिंग संधू याचं निधन झालं आहे. नंदिशने स्वतः ही दु:खद बातमी चाहत्यांसोबत शेअर करत आपलं मन मोकळं केलं आहे. नंदिशचा भाऊ ओंकार कॅन्सरशी लढा देत होता. 28 एप्रिल रोजी त्यांचं निधन झालं आहे. अभिनेता नंदिश सिंग संधू ने आपल्या धाकट्या भावाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत ही धक्कादायक माहिती दिली आहे. नंदिशने शेअर केलेल्या फोटोमध्ये ओंकारच्या चेहऱ्यावर हास्य दिसून येत आहे.
नंदिशने या पोस्टमध्ये लिहलंय, “माझ्या प्रिय, तुझी नेहमी आठवण येईल. हसतमुख, आनंद पसरवणारा, जीवनाला स्पर्श करणारा आणि सच्चा सेनानी. आयुष्याच्या दुसर्या बाजूला पुन्हा भेटू, छोटे." (हे वाचा: Uorfi Javed Net Worth: उर्फी कमाईच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींना टाकते मागे, महिन्याला मिळतात इतके पैसे ) नंदिश सिंग संधूने पुढे लिहलंय, “तू आम्हा सर्वांना शेवटपर्यंत लढायला शिकवलंस आणि तेही हसतमुखाने. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस धैर्याने आणि आनंदाने साजरा करण्याचं वचन तुला देतो. आता तू शांततेत विश्रांती घे. ओंकार सिंग संधू." अभिनेत्याने अनेक हॅशटॅग देत भावाला योद्धा म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.
नंदिश संधू सध्या या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे मित्र आणि इंडस्ट्रीतील लोक तिला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. नंदिश सिंग संधूचे टीव्ही इंडस्ट्रीतील मित्र अर्जुन बिजलानी, भारती सिंग, अंकिता लोखंडे, वहबिझ दोराबजी, आकांक्षा पुरी, मुनिषा खटवानी, रोहित खुराना, मोहम्मद नाझिम खिलजी, मालिनी कपूर, अली मर्चंट, जतिन शाह आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत तिला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.