मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

राकेश बापटने शेअर केला शमिता सोबतचा रोमँटिक VIDEO, पाहून EX वाईफ रिद्धी म्हणाली....

राकेश बापटने शेअर केला शमिता सोबतचा रोमँटिक VIDEO, पाहून EX वाईफ रिद्धी म्हणाली....

बिग बॉस ओटीटीमध्ये  (Bigg Boss OTT) शमिता शेट्टी  (Shamita Shetty) आणि राकेश बापट  (Raqesh Bapat) एकमेकांच्या जवळ आले होते.

बिग बॉस ओटीटीमध्ये (Bigg Boss OTT) शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापट (Raqesh Bapat) एकमेकांच्या जवळ आले होते.

बिग बॉस ओटीटीमध्ये (Bigg Boss OTT) शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापट (Raqesh Bapat) एकमेकांच्या जवळ आले होते.

  मुंबई, 15 फेब्रुवारी-   बिग बॉस ओटीटीमध्ये   (Bigg Boss OTT)  शमिता शेट्टी   (Shamita Shetty)  आणि राकेश बापट   (Raqesh Bapat)  एकमेकांच्या जवळ आले होते. शो संपल्यानंतरही दोघे अनेक डिनर डेटवर एकत्र दिसले होते. राकेश आणि शमिताचा हा पहिला व्हॅलेंटाईन डे   (Valentine Day)  होता. हा दिवस खास बनवण्यासाठी दोघेही एकत्र अलिबागला रवाना झाले होते. आता राकेश बापटने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी एका बोटमध्ये रोमँटिक झालेले दिसून येत आहेत.विशेष म्हणजे राकेश बापटच्या एक्स वाइफने (Raqesh Bapat Ex Wife)  या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राकेशने व्हॅलेंटाईन डे दिवशी एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी एकमेकांकडे प्रेमाने पाहत आहेत. या खास दिवसासाठी शमिता शेट्टीने ऑफ-व्हाइट ड्रेस परिधान केला होता. तर राकेश बापटनेही पांढरा टी-शर्ट, जॅकेट आणि जीन्स परिधान केली होती. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये 'गेहराईयां' चित्रपटातील 'तू मरज है तू दवा है' हे गाणं वाजत होतं. या व्हिडिओमध्ये राकेश बापट आणि शमिता शेट्टी एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवलेले दिसत आहेत. युजर्सना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Raqesh Bapat (@raqeshbapat)

  त्याचवेळी राकेश बापटची एक्स वाईफ रिद्धी डोगराने या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रिद्धीने कमेंट करत लिहिलं आहे - तुम्हा दोघांवर आशीर्वाद राहोत. तसेच, नजर लागू नये असा एक खास ईमोजीसुद्धा शेअर केला आहे. काही चाहत्यांनी या दोघांच्या बॉन्डिंगवर प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि लिहिलं आहे – दोघांना कोणाचीही नजर लागू नये. त्यांच्या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. राकेश बापट आणि शमिता शेट्टीवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्याचबरोबर लोक कमेंट करून हार्ट इमोजी शेअर करत आहेत. बिग बॉस ओटीटीमध्येच राकेश बापट आणि शमिता शेट्टी एकमेकांच्या जवळ आले होते. नंतर शमिता शेट्टीनेही बिग बॉस 15 मध्ये प्रवेश केला. राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्या समर्थनार्थ रिद्धी डोगरा समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. विशाल कोटियनने जेव्हा राकेश-शमिताच्या नात्याची खिल्ली उडवली होती तेव्हा रिद्धी डोगराने लिहिलं होतं, 'प्रेक्षकांनी अशा लोकांना 'बिग बॉस 15' मधून लवकरच बाहेरचा रस्ता दाखवावा, जे लोकांच्या पाठीमागे त्यांची चेष्टा करतात.'
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg Boss OTT, Entertainment

  पुढील बातम्या