मुंबई, 17 फेब्रुवारी: करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी याला करोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या शरीरात करोनाची सौम्य लक्षण आहेत. सध्या क्वारंटिनमध्ये माझ्यावर उपचार सुरु आहेत. अशा आशयाचं ट्विट करुन रणवीरनं करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
I have tested positive for #COVID19. Symptoms are mild. Am quarantining.
— Ranvir Shorey (@RanvirShorey) February 17, 2021
अवश्य पाहा - ‘लशींचा अतिरिक्त साठा भारतीयांसाठी का नाही?’ अभिनेत्रीचा उद्धव ठाकरेंना सवाल राज्यात कोरोनाचा प्रसार वाढला, नव्या लाटेची शंका राज्यात कोरोनाचा (Corona Virus) कहर कायम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रुग्णांच्या संख्येत घट आल्यानंतर आता 42 व्या दिवशी पुन्हा एकदा महाराष्ट्र (Corona Cases In Maharashtra) देशातील सर्वाधित प्रभावित राज्य ठरलं आहे. 3 हजार 365 नव्या कोरोना (Covid-19) रुग्णसंख्येसह राज्यानं केरळला मागे सोडलं आहे. केरळमध्ये सोमवारी 2 हदार 884 कोरोना रूग्ण आढळले होते. राज्यात नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच कोरोनाचे इतके जास्त रूग्ण आढळले आहेत. सोमवारी देशात 9 हजार 93 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मागच्या दोन सोमवारची यासोबत तुलना केल्यास संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी रूग्णसंख्या कमी येण्याचं कारण म्हणजे वीकेंडमुळं स्टाफ कमी असल्यानं चाचण्याही कमी झाल्या होत्या. सोमवारी 4.9 लाखापेक्षाही कमी चाचण्या झाल्या. 6 महिन्यात इतक्या कमी चाचण्या होण्याची ही पहिलीच वेळ होती. सोमवारी देशात 82 रुग्णांचा मृत्यू झाला. यानंतर आतापर्यंत मृतांचा आकडा 1 लाख 55 हजार 844 च्या पार गेला आहे.