Home /News /entertainment /

Ranveer Singh अभिनेत्याला नाही तर 'या' व्यक्तीला फॅशनमध्ये करतो फॉलो, स्वतः केला खुलासा

Ranveer Singh अभिनेत्याला नाही तर 'या' व्यक्तीला फॅशनमध्ये करतो फॉलो, स्वतः केला खुलासा

Bollywood news: स्टार रणवीर सिंह (Ranveer Singh) हा एक अतरंगी अभिनेता आहे. जो त्याच्या चित्रपटांसह त्याच्या स्टायलिश लुकसाठी (Look) ओळखला जातो.

    मुंबई, 10 फेब्रुवारी-  बॉलिवूड (Bollywood) स्टार रणवीर सिंह (Ranveer Singh) हा एक अतरंगी अभिनेता आहे. जो त्याच्या चित्रपटांसह त्याच्या स्टायलिश लुकसाठी  (Look)  ओळखला जातो. शूटिंग सेटवर वावरणाऱ्या रणवीरची एनर्जी अप्रतिम असते. रणवीरने सोशल मीडियावर त्याच्या नवीन लुकचा फोटो शेअर केला आहे आणि चाहत्यांसोबत 'आस्क मी एनीथिंग' (Ask Me Anything)  सेशनही केलं आहे. यादरम्यान चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले, ज्यांना अभिनेत्याने मजेदार आणि रंजक उत्तरे दिली आहेत. रणवीर सिंहने इंस्टाग्रामवर अतिशय कलरफुल शर्ट घातलेला एक फोटो शेअर केला आहे. रणवीरने चेक्सची मोठी टोपी आणि डोळ्यांवर चष्मा घातला आहे. अभिनेता कारमध्ये बसलेला दिसत आहे. रणवीरचे चाहते या फोटोचं कौतुक करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री मिनी माथूरला अभिनेत्याचा हा शर्ट इतका आवडला की तिने कमेंट करत लिहिलं आहे, 'लव्ह लव्ह लव्ह या फिट रणवीरला. मुळात मला हे घालायचं आहे'. असं म्हणत अभिनेत्रीने आपली इच्छा जाहीर केली आहे. रणवीर सिंहने यासोबत चाहत्यांना सांगितलं कि, 'आज मूड आहे.. मला काहीही विचारा' 'मला काहीही विचारा'. बस मग काय, चाहत्यांनाही त्यांच्या आवडत्या अभिनेत्याशी बोलण्याची संधी मिळाली. तुमच्या हायपबीस्ट इन्स्टिंक्टचे रहस्य काय आहे? असा प्रश्न एकाने विचारला असता रणवीरने मजेशीर उत्तर देत म्हटलं 'तुमच्या एक्स्पेन्सिव्ह तिजोरीवर सतत छापेमारी, देव प्रत्येकाला करणसारखा मित्र देवो'. यासह त्याने करण जोहरला टॅगदेखील केलं आहे. एकाने प्रश्न विचारत म्हटलं कि, तू नेहमी इतका आनंदी आणि सकारात्मक कसा असतोस? यावर उत्तर देत रणवीरने म्हटलं, 'मी आशीर्वाद घेतो.आभार मानतो, मी प्रार्थना करतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आयुष्य अडचणींनी भरलेलं आहे..पण चॅप्लिनने म्हटल्याप्रमाणे मनापासून हसा, तुम्ही तुमच्या वेदनांवर नक्कीच मात करू शकाल'. कोणाचा फॅशन फॉलो करतो रणवीर सिंह- असा प्रश्न एका चाहत्याने रणवीर सिंगला विचारला कि, जो कदाचित सर्वांनाच जाणून घ्यायचा आहे. 'तुझं फॅशन इन्स्पिरेशन कोण आहे? याला उत्तर म्हणून रणवीरने बास्केटबॉल प्लेयर डेनिस रॉडमनचा फोटो शेअर करत त्याचं नाव लिहिलं आहे. एकाने विचारले की तू बास्केटबॉलसाठी कधी येत आहेस? यावर रणवीरनं सांगितलं उद्यापासून'. एकाने रणवीर सिंहला विचारलं 'तुमच्या त्वचेचं रहस्य काय आहे? उत्तर देत अभिनेत्यानं सांगितलं,'दररोज 10 लिटर पाणी यावर @AngadBedi' ने हसणारा इमोजी शेअर केला आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actor, Entertainment, Fashion, Ranveer singh, Ranvir singh

    पुढील बातम्या