गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंह न्यूड फोटोशूटमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशातच तो त्याच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आला आहे.
नुकतंच रणवीर-दीपिकानं 'मिजवान 2022 फॅशन शो'मध्ये रॅम्प वॉक केला यावेळीचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावेळी हे कपल रॉयल अंदाजात पहायला मिळालं.
'द मिजवान कल्चर शो' ने10 वर्षे पूर्ण केली आहेत. यावेळी शो स्टॉपर रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण होते.
शो स्टॉपर्स रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण स्टेजवर हातात पकडून चालताना दिसले. यावेळी त्यांचा रोमॅन्टिक अंदाज पहायला मिळाला.
दीपिकाही रणवीरला स्टेजवर किस करताना पहायला मिळाली. न्यूड फोटोशूटनंतर दोघेही पहिल्यांदाच एकत्र दिसले.
या शोच्या उद्घाटनाला अभिनेत्री शबाना आझमी, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि नम्रता गोयल आणि इतर तसेच अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.