• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • दिशा पाटनी अन् राणी मुखर्जीनं मुंबईत खरेदी केले प्रशस्त फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क

दिशा पाटनी अन् राणी मुखर्जीनं मुंबईत खरेदी केले प्रशस्त फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क

दिशा पटनी आणि राणी मुखर्जी यांनी मुंबईतील खार (Khar) येथे एक प्रशस्त फ्लॅट खरेदी केला आहे. बांद्रा खार येथील रुस्तमजी पॅरामाउंट ही सोसायटी अत्यंत लक्झरियस (Luxurious) असून अरबी समुद्रालगत आहे.

  • Share this:
नवी दिल्ली 31 जुलै : कोरोनामुळे (Corona) लॉकडाऊन (Lockdown) किंवा कडक निर्बंध लागू केल्यानं त्याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. रिअल इस्टेट (Real Estate) हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही. घर खरेदीतून मोठा महसूल सरकारला मिळत असतो. अनेक क्षेत्रांना फटका बसल्यानं साहजिकच महसूलावर परिणाम झाला आहे. या स्थितीत सरकारने काही क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याचं ठरवलं असून, त्यात रिअल इस्टेट क्षेत्राचा समावेश केला आहे. या प्रोत्साहनाचा एक भाग म्हणून गृह खरेदीसाठी आवश्यक असणाऱ्या स्टॅम्प ड्युटीत चांगली सूट देण्यात आली आहे. याचा अपेक्षित परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रावर होताना दिसत असून घर खरेदीकडे सर्वसामान्य लोकांचा कल वाढत आहे. ज्याप्रमाणे सर्वसामान्य लोक या स्टॅम्प ड्युटीत (Stamp Duty) मिळणाऱ्या सवलतीचा (Concession) फायदा घेत आहेत. तसाच फायदा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही (Bollywood Celebrity) घेत आहेत. गेल्या काही दिवसांत काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रशस्त घरे खरेदी केल्याची चर्चा आहे. या यादीत आता अभिनेत्री दिशा पाटनी (Actress Disha Patani) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) यांचेही नाव आले आहे. दिशा पाटनीआणि राणी मुखर्जी यांनी मुंबईतील खार (Khar) येथे एक प्रशस्त फ्लॅट खरेदी केला आहे. HBD: सलमानच्या पहिल्या गर्लफ्रेंडशी आहे कियारा आडवाणीचं खास नातं दिशा पाटनी हिने खार पश्चिममधील रुस्तमजी प्रोजेक्ट असलेल्या पॅरामाउंटमध्ये (Paramount) 5.96 कोटींना एक प्रशस्त फ्लॅट खरेदी केला आहे. Zapkey.com ने दिलेल्या वृत्तानुसार, या खरेदी व्यवहाराची तारीख 31 मार्च असून स्टॅम्प ड्युटी सवलतीसाठी ही अंतिम मुदत होती. माध्यमातील वृत्तानुसार, दिशा पाटनी ही सध्या अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत असून, या प्रॉपर्टीची नोंदणी 16 जून 2021 ला झाली आहे. हा फ्लॅट एफ विंगमध्ये 16 व्या मजल्यावर असून, त्याचा एरिया (Area) 1,118.59 चौरस फूट आहे. तिला दोन कार पार्किंग मिळाली आहेत. स्पोर्टस बायोपिक एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी आणि चिनी अॅक्शन कॉमेडी कुंग फू योगा सारख्या चित्रपटात अभिनय केलेल्या या अभिनेत्रीनं या प्रशस्त फ्लॅटसाठी 17.85 लाखांची रक्कम स्टॅम्प ड्युटी म्हणून भरली आहे. स्थानिक ब्रोकर्सने दिलेल्या माहितीनुसार, या फ्लॅटचा प्रति चौरस फूट दर 53,000 रुपये आहे. समंथाने इन्स्टाग्राम नावातून हटवलं 'अख्कीनेनी'; पतीसोबत वाद झाल्याची होतेय चर्चा कुछ कुछ होता है, ब्लॅक आणि वीर झारा सारख्या चित्रपटात भूमिका करणारी अभिनेत्री राणी मुखर्जीने खार पश्चिममधील रुस्तमजी पॅरामाउंटच्या किस्टोर रियल्टर्समध्ये एक प्रशस्त फ्लॅट घेतला आहे. Zapkey.com ने शेअर केलेल्या नोंदणी कागदपत्रांनुसार, या फ्लॅटचा करार 31 मार्च 2021 ला झाला असून, प्रॉपर्टीची नोंदणी 15 जुलै 2021 ला झाली आहे. हा फ्लॅट ई विंगमध्ये 22 व्या मजल्यावर आहे. या घराचा एरिया 1485 चौरस फूट आहे. यात दोन कार पार्किंगचा समावेश आहे. राणी मुखर्जीने हा फ्लॅट 7.12 कोटी रुपयांना खरेदी केला असून, त्यापोटी 21.37 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. स्थानिक ब्रोकर्सने दिलेल्या माहितीनुसार, या फ्लॅटचा प्रति चौरस फूट दर 48,000 रुपये आहे. याबाबत दोन्ही अभिनेत्रींना ई-मेल पाठवला असता, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. तसेच रुस्तमजी बिल्डरने देखील काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बांद्रा खार येथील रुस्तमजी पॅरामाउंट ही सोसायटी अत्यंत लक्झरियस (Luxurious) असून अरबी समुद्रालगत आहे. हा प्रकल्प 1.65 एकरवर विस्तारला आहे. पुरस्कार विजेते आर्किटेक्ट पॅटी माक आणि संजय पुरी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला गेला आहे.
First published: