जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO- रणबीर कपूरनं फोटोग्राफरला विचारलं, चप्पल कुठून घेतली ? आणि...

VIDEO- रणबीर कपूरनं फोटोग्राफरला विचारलं, चप्पल कुठून घेतली ? आणि...

VIDEO- रणबीर कपूरनं फोटोग्राफरला विचारलं, चप्पल कुठून घेतली ? आणि...

हा किस्सा काही दिवसांपूर्वीच मुंबई एअरपोर्टवर घडला. रणबीरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 04 मार्च : अभिनेता रणबीर कपूर सध्या आलिया भट सोबत असलेल्या रिलेशिनशीपमुळे खूपच चर्चेत असतो. मागील वर्षी रिलीज झालेल्या त्याच्या संजू सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. या सिनेमासाठी रणबीरला यंदा फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. त्यानंतर आता रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या प्रमुख भूमिका ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचा ट्रेलर अद्याप रिलीज झाला नसला तरी रणबीर सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. एका फोटोग्राफरला त्याच्या चप्पलबाबत विचारतानाचा रणबीरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

    जाहिरात

    हा किस्सा काही दिवसांपूर्वीच मुंबई एअरपोर्टवर घडला. रणबीर कपूर मुंबई एअरपोर्टवर दिसतातच अनेक फोटोग्राफर त्याचे फोटो काढण्यासाठी सरसावले. त्याचवेळी रणबीरनं एका फोटोग्राफरला विचारलं की ही चप्पल कुठून घेतली. मात्र फोटोग्राफरला ऐकू न गेल्यानं रणबीरनं पुन्हा तोच प्रश्न विचारला. यावर त्या फोटोग्राफरनं अंधेरी स्टेशन असं उत्तर दिलं आणि काही वेळातच रणबीरचा हा गंमतीशीर अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झाला. रणबीरचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांनीही आवडला. रणबीरचं हे वागणं कोणालाही नवीन नाही. रणबीर सेटवरही अशाप्रकारे सर्वांची फिरकी घेण्यासाठी प्रसिद्ध आहे.

    रणबीर सध्या अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये काम करत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड आलिया भट सुद्धा प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय बिग बी अमिताभ बच्चन यांचीही या सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे. मात्र या बहुचर्चित सिनेमात रणबीरची नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. रणबीरनं याअगोदर अयान मुखर्जीसोबत ‘वेकअप सिड’ आणि ‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

    जाहिरात
    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात