12 मे : दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरच्या ‘तमाशा’ सिनेमाचा बाॅक्स आॅफिसवर चांगलाच तमाशा झाला. पण तरीही Ra गेल्या आठवड्यात दोघंही विधू विनोद चोप्राच्या आॅफिसमध्ये आले होते. सिनेमाच्या कथेसाठी चर्चा झाली. अनेकांचं म्हणणं असंय की, या दोघांना एकत्र घेण्यात विधू विनोद चोप्राचा अति आत्मविश्वास कारणीभूत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही तो स्वत:च करणारेय. वजीर सारखा मोठा सिनेमा पडल्यानंतर विधू विनोद चोप्राला गरज आहे एका हिटची. पाहू या यावेळी तरी दीपिका-रणबीर त्याला यश देतात का?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.