
1985 मध्ये आलेला 'राम तेरी गंगा मैली' सिनेमा खूप हिट ठरला. प्रेक्षकांनी या सिनेमाला अक्षरशः डोक्यावर घेतलं. या सिनेमामुळे एका रात्रीत स्टार बनवलेली अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी.

अभिनेत्री मंदाकिनीच्या सौदर्यानं आणि निरागसतेनं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र काही काळानंतर ती सिनेसृष्टीपासून दूरावली.

बऱ्याच दिवसांनंतर मंदाकिनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती आणि तिची मुलगी दोघीही चर्चेचा विषय ठरत आहे.

सोशल मीडियावर मंदाकिनी आणि तिच्या मुलीचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये मंदाकिनीची मुलगी तिच्यासारखीच दिसत असल्याचं पहायला मिळतंय.

मंदाकिनीच्या मुलीचं नाव राब्जे इनाया ठाकूर असं आहे. राब्जेचा फोटो पाहून कोणीही म्हणेल की तिच्या आईसारखीच दिसते.

मंदाकिनीनं 'राम तेरी गंगा मैली' व्यतिरिक्त 'डान्स डान्स', 'प्यार के नाम कुर्बान', 'लडाई' आणि नाग नागिन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.




