मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लेस्बियन क्राइम फिल्म Dangerous चा ट्रेलर प्रदर्शित, इंटरनेटवर धुमाकुळ घालतोय नैना-अप्सराचा बोल्ड अंदाज

लेस्बियन क्राइम फिल्म Dangerous चा ट्रेलर प्रदर्शित, इंटरनेटवर धुमाकुळ घालतोय नैना-अप्सराचा बोल्ड अंदाज

डेंजरस असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर अक्षरश: वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 14 मे: राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हे बॉलिवूडमधील एक नामांकित दिग्दर्शक म्हणून ओलखले जातात. सत्या, कंपनी, सरकार, रंगीला यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या या दिग्दर्शकानं आजवर विविध विषय हाताळले आहेत. आता हा दिग्दर्शक स्त्रियांच्या समलैंगिक भावनांवर आधारित एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Dangerous Lesbian Crime movie) डेंजरस असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर अक्षरश: वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

डेंजरस हा भारतातील पहिला लेस्बियन क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट महिलांच्या समलैंगिक भावनांवर आधारित असून यामध्ये थ्रिलर एलिमेंट देखील दाखवण्यात आला आहे. नुकतंच या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री अप्सरा रानी आणि नैना गांगुली यांचे अनेक बोल्ड सीन दाखवण्यात आले आहेत. शिवाय दोघांचं एकमेंबद्दलचं प्रेम दाखवण्यात आलेलं आहे. आजवर इतर कुठल्याही मेन स्ट्रीम चित्रपटात स्त्रियांचे इतके बोल्ड सीन पाहिले नाहीत अशा प्रतिक्रिया प्रेक्षक हे ट्रेलर पाहिल्यावर देत आहेत.

" isDesktop="true" id="551066" >

या चित्रपटात दोन अभिनेत्री आहेत. ज्यांनी एकमेकींच्या प्रेमिकांची भूमिका पार पाडली आहे. अभिनेत्री अप्सरा राणी आणि नैना गांगुली यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोघींची आपल्या बॉयफ्रेंडकडून प्रेमात फसवणूक झालेली असते. त्यामुळे दोघीही आतून पूर्णपणे तुटलेल्या असतात. आणि त्यानंतर समलैंगिक नात्यात अडकतात. एकमेकींच्या प्रेमात इतक्या बुडतात की जीव द्यायला आणि जीव घायला सुद्धा तयार होतात. असं काहीसं या चित्रपटाचं कथानक आहे.

First published:

Tags: Entertainment, Ram gopal varma, Shocking video viral