जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / राम गोपाल वर्मानं COVID-19 वर तयार केला जगातला पहिला सिनेमा, पाहा Coronavirus Trailer

राम गोपाल वर्मानं COVID-19 वर तयार केला जगातला पहिला सिनेमा, पाहा Coronavirus Trailer

राम गोपाल वर्मानं COVID-19 वर तयार केला जगातला पहिला सिनेमा, पाहा Coronavirus Trailer

COVID-19 वर आधारित असलेल्या राम गोपाल वर्माच्या या पहिल्या सिनेमाचं शूटिंग लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून करण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 मे : कोरोना व्हायरसनं जगभरातील लोकांना हैराण केलं आहे. भारतातही या व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी 23 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. जे आता 31 मे पर्यंत कायम राहणार आहे. सरकार कडून वारंवार सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याबाबत जागरुक केलं जात आहे. पण या लॉकडाऊनचा परिणाम बॉलिवूडवर सुद्धा झाला आहे. अनेक सिनेमांचं शूटिंग थाबवण्यात आलं. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत एका जाहिरातीचं शूटिंग सुरू केलं आहे. अशातच आता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सुद्धा या व्हायरसवर एका सिनेमाची निर्मिती करत आहेत. ज्याच नाव आहे कोरोना व्हायरस. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण जगभरात वाढत असतानाच बरेच फिल्म मेकर्स आणि आर्टिस्ट त्यांच्या क्रिएटीव्हीटीचं प्रदर्शन करताना दिसत आहेत. कोण सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रेटींच्या मुलाखती घेत आहे. तर कोणी या व्हायरसवर लहान लहान व्हिडीओ तयार करत आहेत. पण दिग्दर्शक राम गोपाल वर्मानं कोरोना व्हायरस हा या व्हायरसवरील जगातला पहिला सिनेमा तयार केला आहे. जो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राम गोपल वर्मानं त्याच्या ट्विटर हँडलवर या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. हा एक तेलुगू सिनेमा आहे.

या ट्रेलरमध्ये एका कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, न्यूजपासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडेच कोरोना व्हायरसची दहशत पसरलेली दिसत आहे. अशात त्या घरातल्या एका मुलीला खोकला सुरू होतो. त्यामुळे ते संपूर्ण कुटुंब तिची कोरोना टेस्ट करावी की नाही याचा विचार करू लागतं. भीती आणि कन्फ्यूजनसोबत सिनेमाची कथा पुढे सुरू होते. पण या ट्रेलरवरून समजतं की, राम गोपाल वर्मानं एक हॉरर सिनेमा तयार केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात