मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘आता त्याला कसं वाटत असेल?’; छोटा राजनच्या मृत्यूनंतर राम गोपाल वर्मांना दाऊदची चिंता

‘आता त्याला कसं वाटत असेल?’; छोटा राजनच्या मृत्यूनंतर राम गोपाल वर्मांना दाऊदची चिंता

बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता दाऊदला कसं वाटत असेल? असा प्रश्न त्यांनी आपल्या चाहत्यांना केला आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 7 मे: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Chhota Rajan Dies) छोटा राजनला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. तिहार तुरुंगात असताना त्याला कोरोनाची लागण झाली होती अशी चर्चा आहे. दरम्यान या चर्चेवर प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता दाऊदला कसं वाटत असेल? असा प्रश्न त्यांनी आपल्या चाहत्यांना केला आहे.

“छोटा राजन दाऊद कंपनीतील क्रमांक दोनचा डॉन होता. तरी देखील कोरोनानं त्याला मारलं. विचार करतोय दाऊदला आता कसं वाटत असेल? तो कोरोनाला देखील शूट करणार का?” अशा आशयाचं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे. या ट्विटद्वारे त्यांनी छोटा राजनच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसिद्ध सतार वादक देबू चौधरी यांच्या निधनांनंतर आठवड्याभरातच मुलाचाही कोरोना मृत्यू

छोटा राजन याच्यावर अपहरण आणि हत्येच्या अनेक प्रकरणांसह 70 हून अधिक केसेस दाखल होते. त्याला मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे हिच्या हत्येत दोषी करार देत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी हनीफ कडावालाच्या हत्या प्रकरणात विशेष सीबीआय कोर्टाने त्याला बरी केली होती. सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तुरुंगात असतानाही अनेक आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे.

First published:

Tags: Covid cases, Crime, Ram gopal varma