राम गोपाल वर्माच्या हाॅरर सिनेमात मिथुन चक्रवर्ती

राम गोपाल वर्मा हाॅरर सिनेमातून अभिषेक बच्चनलाही रिलाँच करतोय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2017 05:50 PM IST

राम गोपाल वर्माच्या हाॅरर सिनेमात मिथुन चक्रवर्ती

10 एप्रिल : 'सरकार-3' सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहणारे राम गोपाल वर्मा त्याच्या पुढील सिनेमाच्या तयारीला लागलाय. पुन्हा एकदा राम गोपाल वर्मा हॉरर सिनेमाकडे वळणार आहे आणि या सिनेमातून पुन्हा एकदा समोर येतायत अभिनेता मिथुन चक्रवर्ती.

बऱ्याच दिवसांपासून आजारी असणारे मिथुन दा २०१५ मध्ये आयुष्यमान खुरानाच्या 'हवाईजादा' सिनेमात काम करताना दिसले होते.  छोट्या पडद्यावरच्या 'डान्स इंडिया डान्स'मध्ये जज सुद्धा होते.

राम गोपाल वर्मा त्यांच्या या हाॅरर सिनेमात अभिनेता अभिषेक बच्चनला रिलॉन्च करतायत. या सिनेमात अभिषेक एका पोलिस ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. 'सरकार-3' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाची तयारी सुरू केली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...