मुंबई, 11 जानेवारी- बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी’ मुळे प्रचंड चर्चेत होती. दरम्यान आता अभिनेत्री आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल दुरानीसोबत लग्नगाठ बांधत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये आदिल आणि राखी गळ्यात वरमाला घालून फोटोसाठी पोज देताना दिसून येत आहेत. त्यांच्या हातामध्ये मॅरिज सर्टिफिकेट दिसून येत आहे. यावरुन दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याचा अंदाज बांधला जात आहे. अभिनेत्री-डान्सर राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असते. राखी सतत आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांच मनोरंजन करत असते. सोबतच राखी आपल्या खाजगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. राखी गेल्या अनेक दिवसांपासून दुबई स्थित उद्योगपती आदिल दुरानीला डेट करत आहे. या दोघांनी स्वतः माध्यमांना आपल्या नात्याबाबत सांगितलं होतं. तसेच राखी आणि आदिल सतत जीममध्ये आणि एयरपोर्टवर एकत्र दिसून येत होते. **(हे वाचा:** Anu Aggarwal B’day: ‘आशिकी गर्ल’ अनु अग्रवाल आता दिसते अशी; एका घटनेनं बदललं अभिनेत्रीचं अख्ख आयुष्य ) राखी आणि आदिल लग्न कधी करणार याची त्यांच्या चाहत्यांना अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. दरम्यान आता राखी सावंत आणि आदिल दुरानीने गुपचूप लग्न उरकल्याचं समोर आलं आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमणात व्हायरल होत आहेत. यामध्ये राखी आणि आदिलने वरमाला घातलेले दिसून येत आहेत, या दोघांनी कोर्ट मॅरेज केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र राखी किंवा आदिलने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीय.
दरम्यान राखी सावंत ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरात राखीने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं आहे. ती टॉप 5 मध्ये पोहोचली होती. राखीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद मिळत होता. राखी 9 लाख घेऊन महाअंतिम सोहळ्यात बाहेर झाली होती. बिग बॉसच्या घरात फॅमिली वीकमध्ये आदिल दुरानी राखीला भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात सहभागी झाला होता.
यापूर्वी राखी सावंत बिग बॉस हिंदीमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी अभिनेत्रीने रितेश सिंग या उद्योगपतीसोबत आपण लग्न केल्याचं सांगितलं होतं. विशेष म्हणजे राखीसोबत रितेशसुद्धा या शोमध्ये सहभागी झाला होता. परंतु शोमधून बाहेर आल्यानंतर या दोघांनी आपण विभक्त झाल्याचं सांगत सर्वानाच चकित केलं होतं. दरम्यान सध्या राखी सावंतची आई ब्रेन ट्युमरशी झुंज देत आहे. अशातच राखी सावंतचे फोटो व्हायरल झाल्याने अभिनेत्रीने आईची प्रकृती गंभीर असून लग्न केल्याचं म्हटलं जात आहे. मात्र राखीच्या वेडिंग सर्टिफिकेटवर तारीख जुनी दिसून येत आहे. त्यामुळे राखीने आधीच गुपचूप लग्न केल असून आता फक्त खुलासा झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.